Premium

भररस्त्यात डोक्यावर मोठा ब्रेडचा ट्रे ठेवून सायकल चालवतोय ‘हा’ व्यक्ती, तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण डोक्यावर ब्रेडचा एक जड आणि भलामोठा ट्रे ठेवून सायकल चालवत आहे तेही भररस्त्यात वाहनांच्या रहदारीमध्ये

man carrying heavy tray of breads on his head while cycling in busy traffic in egypt people surprised watch
तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम bicyclefilmfestival)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला अशा व्हिडीओबाबत सांगणार आहोत जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण डोक्यावर ब्रेडचा एक जड आणि भलामोठा ट्रे ठेवून सायकल चालवत आहे तेही भररस्त्यात वाहनांच्या रहदारीमध्ये. विशेष म्हणजे हा तरुण सायकलचे हँडल न पकडताच सायकल चालवत आहे. अशाप्रकारे सायकल चालवाताना तरुणांचा बॅलन्स म्हणजेच संतलून पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ bicyclefilmfestival नावाच्या अंकाउटवर पोस्ट केलेला आहे. जो शहरातील सायकल संस्कृतीसंबधीत व्हिडीओ शेअर करत असते. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”इजिप्तच्या काहीरायेथे सायकलद्वारे ब्रेड पोहचवणे”

हा व्हिडीओ काहिरा येथील एका सायकल चालकाचा आहे. हा व्हिडीओ इजिप्तच्या राजधानीमधील सामान्य दृश्य आहे जिथे सायकलचालक बेकरीमधून दुकांनमध्ये ब्रेड घेऊ जातात हे अगदी सामान्य दृश्य आहे.

हेही वाचा – दुकानात चोरी करू दिली नाही म्हणून चोरट्याने व्यक्तीचे डोकं दिले पेटवून, थरारक Video Viral

य़ा व्हिडिओला कमेंट करताना एका यूजरने इंस्टाग्राम यूजरने सांगितले की, ”हे फक्त इजिप्तमध्येच होऊ शकते. हे लोक आश्चर्यकारक आहे. हा व्यक्ती काहिरामध्ये रहदारीमध्ये सायकल चालवतो आहे.”

हेही वाचा – औषध विक्रेत्याने चुकून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, आईने तिच्या जुळ्या मुलांना गमावले

या आठवड्याच्या सुरुवातीला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता जिथे न्युयॉर्कमध्ये एका चौकात एक सायकल चालक आपल्या डोक्यावर फ्रिज ठेवून बॅलन्स करत होता भारतामधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या डोक्यावर सुकलेल्या गवताची पेंड्या ठेवून सायकल चालवत होता. त्या व्यक्तीने दोन्ही हातांनी गवताच्या पेंड्या पकल्या होता आणि हँडल न पकडताच सायकल चालत होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man carrying heavy tray of breads on his head while cycling in busy traffic in egypt people surprised watch snk

First published on: 06-10-2023 at 19:36 IST
Next Story
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…