Man caught Huge Snake With Bare Hands : माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण काही प्राणी असे असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवण्याआधी माणसाला 10 वेळा विचार करावा लागतो. अशाच धोकादायक आणि विषारी प्राण्यांपैकी एक म्हणजे साप. सापाला हात लावणं तर दूरच, हा प्राणी जवळ दिसला तरीही कोणाचाही थरकाप उडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डझनभरापेक्षा जास्त साप हातामध्ये घेऊन उभा असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्यक्ती गाडीपुढे आडवा आलेला महाकाय साप हाताने उचलून फेकून द्यायला निघाला होता. पण नेमकं त्याचवेळी असं काही घडलं जे पाहून तुमचा थरकाप उडेल.

ज्यांना सापांची भीती वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडीओ एखाद्या भयानक स्वप्नासारखा आहे. कारण व्हिडीओमध्ये एक महाकाय साप दिसून येतोय. एक व्यक्ती गाडी चालवत असताना रस्त्यावर हा महाकाय साप त्याच्या गाडीपुढे आडवा आला. हा महाकाय साप रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूकडे जात होता. सुदैवाने या व्यक्तीच्या गाडीखाला हा महाकाय साप आला नाही. या व्यक्तीने वेळीच आपली गाडी काही अंतर दूर थांबवून तो रस्त्यावर उतरला. यानंतर पुढे त्याने जे केलं ते पाहून तुम्ही घाबरून जाल.

आणखी वाचा : बसमध्ये मोफत प्रवास करण्यास आजीचा नकार; कंडक्टरशी घातलेल्या वादाचा VIDEO VIRAL

आपल्या गाडीपुढे आडवा आलेला महाकाय साप पाहून या व्यक्तीने हाताने या महाकाय सापाच्या शेपटाला पकडलं आणि तो ज्या बाजूकडे जात होता त्या दिशेने या महाकाय सापाला फेकून दिलं. व्हिडीओमध्ये तुम्हाला कारमध्ये बसलेल्या लोकांचा ओरडताना आणि जवळ जाण्यास नकार देताना ऐकू येईल. या माणसाने सापाला फेकून देताच हा महाकाय साप कोणताही हल्ला न करता थेट जंगलात निघून जातो.

आणखी वाचा : रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, “नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?”

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलाय. कासवान यांनी या व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शननुसार ही घटना दक्षिण भारतातील आहे. “यावर तुमची मतं द्या. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या परिसराला भेट देणे, त्यांना त्रास देणे की रस्ता अपघातापासून वाचवणे. व्हिडीओ दक्षिण भारतातील महत्त्वाच्या वन्यजीवांचा आहे.”, असं या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

आणखी वाचा : Queen Victoria स्टाईलमध्ये या ८९ वर्षीय आजीने साजरा केला वाढदिवस, VIRAL VIDEO ला २३ मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांच्या मते, माणसाने सापाला अपघातातून वाचवले कारण तो गाडीखाली येऊ शकला असता. एका यूजरने लिहिले की, ‘तो सापाला गाडीखाली येण्यापासून वाचवत होता असे दिसते. दुसर्‍याने लिहिले, “तो शांतपणे चालत होता, त्याला व्यवस्थित पकडले, त्याला झुडपात सोडले आणि परत आला… त्याने प्राण्याला वाचवले.”दुसरा यूजर म्हणाला, “मला वाटते की तुमचे हेडलाइट्स बंद करून साप निघून जाण्याची वाट पाहणे चांगले आहे. हे माझ्यासोबत एकदा घडले आणि आम्ही साप निघून जाण्याची वाट पाहत होतो. वन विभागाजवळ किंवा सर्वांसाठी रात्रीच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे ही एक सामान्य घटना आहे.”