viral video man dance on panyala jate song : भूतकाळाचा विचार करून रडणे, भविष्याची चिंता करणे, ही दोन्ही दुःखाची कारणे आहेत. पण, जे समोर आहे त्यांचा आनंद घेण्यातच खरं सुख आहे. आनंदी राहणं ही एक सवय आहे जी आपण दैनंदिन जीवनात आत्मसात करू शकतो. पण, आनंदी कसं राहायचं याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. आजचा व्हायरल व्हिडीओ तसेच काहीतरी सांगतो आहे. एका आजोबांनी आनंदी राहण्याचा स्वतःचा मार्ग शोधून काढला आहे.

टेरेसवर भजनाचा कार्यक्रम सुरु आहे. यादरम्यान “पाण्याला जाते पाणी घेऊन येते” भजन सादर केले जात आहे. सगळे टाळ्या वाजवत भजनाचा आनंद लुटत असतात. यादरम्यान एक आजोबा भजनावर ठेका धरायला सुरुवात करतात. सगळ्यांच्या मधोमध उभं राहून भजनाच्या प्रत्येक ओळीवर अगदी हुबेहूब ठेका धरतात आणि नकळत सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येते. त्यांचा या वयात उत्साह पाहून सगळे टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देतात.

“जीवनाचा खरा आनंद हाच” (Viral Video)

नेहमी हसतमुख राहणं आणि आनंदी राहणं हे जीवनात थोडे मुश्किलच असते. परंतु आपल्या जगण्याची पद्धत आपणच बदलून आपली चिंता आणि मनामध्ये असणारे तणाव सहजपणे दूर करू शकतो.आपण विनाकारण काही गोष्टींचा स्वत:ला त्रास करुन घेतो आणि आपला आनंद गमावून बसतो. पण, या आजोबांनी लहान लहान गोष्टींचा कसा आनंद घेतला पाहिजे. याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर मांडले आहे. गाण्यावर ठेका धरत ते भजनाचा आनंद लूट आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shri_swami.sawli_11या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “कला आणि आवड जिवंत ठेवणारा माणूस त्याच्यातल्या माणसाला जिवंत ठेवण्याचा काम करतो” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आमचे काका एक नंबर”, “जीवनाचा खरा आनंद हाच आहे”, “छंद माणसाला आयुष्य जगायला मदत करतो”, “हा आनंद विकत घेता येत नसतो”, “सुख”, “खूप छान” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…