scorecardresearch

Premium

चित्रपटगृहात बाहेरील खाद्यपदार्थ लपवून नेण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, Video पाहून नेटकरीही झाले थक्क

खाण्यासाठी आणलेले पदार्थ गुपचूप खाण्यासाठी एक भन्नाट जुगाड केला. तरुणाचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे स्विगी इंस्टामार्टनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलीय.

Desi Jugaad Viral Videos
चित्रपटगृहात स्नॅक्स नेण्यासाठी केला जुगाड. (Image-Instagram)

Todays Viral Video : चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्याची तमाम प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. पण चित्रपट पाहताना अनेकांना स्नॅक्स खाण्याची आवड असते. मात्र, चित्रपटगृहात स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. एक तरुण ‘ओएमजी २’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेला होता. त्यावेळी त्याने खाण्यासाठी आणलेले पदार्थ गुपचूप खाण्यासाठी एक भन्नाट जुगाड केला. तरुणाचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे स्विगी इंस्टामार्टनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिलीय.

अल्फेश शेख नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी अशा गोष्टींना जीनियस हॅक असं म्हणतो. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, शेख एका फूड कोर्टच्या टेबलजवळ बसलेला असतो. त्याच्या समोर दोन चिप्सचे पॅकेट, कोल्ड ड्रिंक्सची एक बॉटल आणि अन्य काही पदार्थ असतात. त्यानंतर तो सर्व पदार्थांना बुटाच्या एका डब्ब्यात एकत्र करून ठेवतो. त्यानंतर त्या बॉक्सला तो टेप लावून सील करतो आणि चित्रपटगृहात स्नॅक्स बॉक्ससोबत प्रवेश करतो आणि शेख चित्रपट पाहताना त्या पदार्थांवर ताव मारतो.

amazing jugaad video
मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड; समोर बसलेल्या महिलांनी स्वत:हून दिली बसायला जागा, VIDEO एकदा पाहाच
Actor Ritesh Deshmukh shared funny videos
जुगाडू बाप! चिमुकल्याला बाईकवरुन फिरवण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Gas Lighter Jugaad Video
महिलेच्या केसांना कर्ल करण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, गॅस लायटरचा ‘असा’ केला वापर, Video पाहून थक्क व्हाल
Desi Jugaad Viral Video
आरारारारा खतरनाक! झोपण्यासाठी चक्क ट्रकच्या खाली बेड बनवला, धावत्या ट्रकचा व्हिडीओ पाहून लोक चक्रावले

नक्की वाचा – चिमुकल्याने कधीच वाढदिवस साजरा केला नाही! पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिलं मोठं सरप्राईज, Video पाहून रडू येईल

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला ३५ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर दोन मिलियनहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर जबरदस्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत. स्विगी इन्स्टामार्टनेही या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सेक्शन ए’चा सर्वात हुशार विद्यार्थी, असं स्विगीनं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे. तसंच अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ही कल्पना खूप छान आहे. मी अशाप्रकारचा जुगाड तीनवेळा केला आहे आणि तो यशस्वी सुद्धा झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man did smart jugaad to hide outside food items in theatre people shocked after watching desi jugaad viral video on instagram nss

First published on: 20-09-2023 at 15:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×