scorecardresearch

Video: आगीबरोबर स्टंट करायच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग; ‘तो’ पायजमा काढून पळत सुटला अन..

या माणसाला स्टंटसोबत खेळण पडल भारी.. पायजम्याला आग लागताच तो असा पळत सुटका की

Video: आगीबरोबर स्टंट करायच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग; ‘तो’ पायजमा काढून पळत सुटला अन..
photo(social media)

काही लोक पैसे कमावण्याच्या नादात खतरनाक स्टंट करताना दिसतात. मात्र हे स्टंट करत असताना ही लोक स्वतःच्या जीवाशी देखील खेळत असतात. कधीकधी हे स्टंट इतके भयंकर असतात की त्यात माणसाचा जीवही जाऊ शकतो. यासंबधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात स्टंट करतेवेळी लोकांचा अपघात झाला आहे. त्यामुळे असे स्टंट करते करतेवेळी विशेष काळजी घेणे गरजेची आहे. खरं तर स्टंटमॅन सराव करून स्टंट करतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी पूर्ण झाल्यानंतरच स्टंटमॅन स्टंट करतात. अशाच एका स्टंटसाठी तयारी करत असताना भयंकर प्रकार घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये स्टंटमॅन आगीचा स्टंट करत होता. एक जळते लाकूड हवेत फेकत हातात घेत होता. त्यानंतर हे जळते लाकूड तो पायजम्यात धरून ठेवत होता. सुरुवातीला त्याचा स्टंट व्यवस्थित सुरू होता. पण पुन्हा एकदा स्टंट करतेवेळी जळत्या लाकडाने पायजम्यात आतून पेट घेतला. पायजम्याला आतून आग लागली आणि ती विझता विझेना. आग लागल्याची समजताच स्टंटमॅन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. पण ही आग वाढतच चालली होती. आग लागल्याची समजताच तिथे असलेला अजून एक माणूस मदतीस धावून आला. पण तोपर्यंत ही आग प्रचंड वाढली होती. आग विझत नसल्याचे लक्षात येताच स्टंटमॅनने पायजमा काढला आणि जवळ असलेल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली.या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: Video: भर लग्नमंडपात घुसला संतापलेला बैल; अडवायला गेलेल्या माणसावर हल्ला करत त्याला फेकून दिले अन..)

येथे पाहा खतरनाक स्टंटचा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला! समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…)

हा व्हिडीओ ‘vikashkushwaha9011’ नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक जणांनी बघितला असून लोकं हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसंच अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओत दिसत असलेले दृश्य खरंच धोकादायक आहे. हा स्टंट स्टंटमॅनच्या जीवावर बेतला होता. पण स्टंटमॅनने ऐनवेळी पायजमा काढून टाकला आणि स्वतःचा जीव वाचविल्याचे व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 19:08 IST

संबंधित बातम्या