scorecardresearch

Video : असा शिक्षक होणे नाही! बायोलॉजी आणि सोशियोलॉजी मधील फरक ऐकूण तुम्हाला हसू आवरणे होईल कठीण

या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्तीेने biology आणि sociology मधील सांगितलेला फरक ऐकून त्याच्यावर कमेंट्सचा भडीमार केला आहे.

viral video man explains difference between biology and sociology
एक व्यक्ती बायोलॉजी आणि सोशियोलॉजीमधील एक मजेशीर फरक सांगतो ( @memeuniverse.teb instagram)

Man Explains Difference Between Biology And Sociology Funny Video : बहुतेकांनी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी आणि समाजशास्त्र म्हणजे सोशियोलॉजी हे विषय शाळा- कॉलेजमध्ये अभ्यासले असतील, काहींनी त्यात मास्टर देखील केले असेल. यामुळे या दोन्ही विषयांमध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहित असेलच. विद्यार्थ्यांना शाळेतच तर या विषयांची माहिती दिली जाते आणि ज्यांनी या विषयांचा अभ्यास केला त्यांना याची व्याख्या माहीत असते. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती या दोन्ही विषयांची मजेदार आणि एक वेगळी व्याख्या समजावून सांगत आहे. जे ऐकूण तुम्हाला हसू आवरणे कठीण होईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो व्यक्ती पहिल्यांदा बोर्डवर इंग्रजीमध्ये सोशियोलॉजी आणि बायोलॉजी असे लिहितो. यानंतर तो दोन्ही विषयांमधील फरक सांगायला सुरुवात करतो. यावेळी तो एक उदाहरण देत म्हणतो की, नवजात बाळ जर त्याच्या वडिलांसारखे दिसत असेल तर त्याला बायोलॉजी म्हणतात, आणि मुलाला बायोलॉजिक चाइल्ड म्हणतात. पण जर मूल त्याच्या शेजाऱ्यांसारखा दिसत असेल तर त्याला सोशोलॉजी म्हणतात आणि त्या मुलाला सोशोलॉजी मूल म्हणतात. या व्यक्तीने दोन्ही विषयांमधील सांगितलेला फरक पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे. या व्यक्तीने त्याच्या अकाऊंटवर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी @memeuniverse.teb नावाच्या एका अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता, जो आता तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप हसवत आहे. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला असला तरी, यामध्ये तो व्यक्ती असं काही बोलले आहे, जे ऐकून लोकांना हसू आवरत नाही. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती सोशियोलॉजी आणि बायोलॉजी यातील फरक स्पष्ट करून सांगताना दिसत आहे.

Video : लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहचली हॉस्पिटलमध्ये, स्टंटबाजीच्या नादात जळाला चेहरा

हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोकांनी अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. यावर एका युजरने लिहिले की, यापेक्षा चांगला शिक्षक पुन्हा होऊ शकत नाही. तर दुसऱ्या एका युजरने, हाच सर्वोत्तम शिक्षक आहे, असे म्हटले आहे. व्हिडीओतील त्या व्यक्तीच्या अनोख्या दृष्टीकोन पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. काहींनी त्याला समाजशास्त्र विषयातील एक प्रख्यात विद्वान म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 12:50 IST

संबंधित बातम्या