Man Face Got Fire And Burnt: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेक गोष्टी करत असतात. मात्र प्रसिद्ध होण्याच्या नादात कधी कधी त्यांना त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागतात. हे परिणाम इतके वाईट असतात की यात मोठे नुकसान देखील होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात एक मुलगा तोंडात पेट्रोल भरून आग लावण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा डाव फसतो आणि आग त्याच्या तोंडाला लागते. हा व्हायरल व्हिडीओ अनेक जणांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक कार्यक्रम सुरू आहे आणि काही लोक स्टेजवर उभे आहेत. त्यातील एक मुलगा तोंडात पेट्रोल भरून आग बाहेर काढत आहे. जेव्हा त्याने तोंडात पेट्रोल भरून आग पेटवली तेव्हा ती आग त्याच्या चेहऱ्याला लागली. त्या मुलाने लगेच ती आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला विझवता आली नाही. त्यानंतर स्टेजवरील काही लोकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यांनतर ती आग कशीबशी विझली. या मुलाला आगीशी खेळणं चांगलचं महागात पडलं. ( हे ही वाचा: नवरीला मागे बसवत नवऱ्याने हवेत उडवली फिल्मी स्टाईल बाईक; जगावेगळे प्री-वेडिंग फोटोशूट पाहण्यासाठी हा Viral Video एकदा पाहाच) येथे व्हिडिओ पाहा ( हे ही वाचा: Swarm of bees: या माणसाचा हात भरलाय चक्क मधमाश्याच्या पोळ्याने; पाठीवर राणी माशी घेऊन ऐटीत फिरणाऱ्या व्यक्तीचा Viral Video एकदा पाहाच) सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलाच्या एका हातात आगीची ठिणगी होती आणि दुसऱ्या हातात पेट्रोलची बाटली घेऊन त्याने आग पेटवली होती, पण तोंडातून आग बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच त्याच्या चेहऱ्यावर पेट्रोल पसरले आणि आगीने त्याच्या चेहऱ्याचा पेट घेतला. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.