scorecardresearch

Viral Video : भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीला खाली पाडलं, त्या तरुणाचा कंट्रोल सुटला अन् घडलं…

….अन् नवऱ्यासमोरच नवरीला खाली पाडलं, भर लग्नमंडपात असं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Viral Video : भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीला खाली पाडलं, त्या तरुणाचा कंट्रोल सुटला अन् घडलं…
नवरा-नवरीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय. (Image-Instagram)

Groom And Bride Viral Video : लग्नसराईचा सीजन सुरु झाल्याने नवरा-नवरीचे एकापेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. कधी डीजेच्या तालावर नवरी थिरकताना दिसते तर कधी हळदीच्या मंडपात नवऱ्याचे जबरदस्त ठुमके पाहायला मिळतात. पण एका लग्नसोहळ्यात भलतच घडलं आहे. नवरा-नवरी लग्नमंडपात असताना एका तरुणाने सर्व वऱ्हांड्यासमोरच नवरीला खाली पाडलं. तरुणासोबत त्याचे काही मित्रही लग्नमंडपात एक सफेद रंगाची चादर खेचण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या तरुणांमध्ये चादर ओढण्याची रंगलेली स्पर्धा नवरीची मोठी फजिती करुन गेली. नवऱ्यासमोरच नवरीला खाली पाडल्याने लग्न सोहळ्यात एकच हशा पिकला. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.

तरुण चक्क नवरा-नवरीच्या अंगावरच पडला अन् झाली मोठी फजिती, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नवरा-नवरी लग्नमंडपात बसल्याचं दिसत आहे. यावेळी एका सफेद रंगाच्या चादरीवक तांदुळ टाकून वऱ्हाडी मंडळी रितीरिवाजाप्रमाणे जबरदस्त स्पर्धा करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ही चादर नवरा-नवरीच्या डोक्यावर तीन वेळा फिरवल्यानंतर दोन्ही स्पर्धकांमध्ये ती चादर खेचण्यासाठी मोठी स्पर्धा रंगते. याचदरम्यान, नवरा-नवरीच्या उजव्या बाजूला असलेला एक तरुणी थेट त्या दोघांच्या अंगावर पडतो. पण त्या तरुणाचा जास्त तोल नवरीच्या बाजूला गेल्यानं नवरी थेट खाली पडते. भर लग्नमंडपातच हा मजेशीर प्रकार घडल्याने सर्व वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूज मिळाले आहेत.

नक्की वाचा – किंग कोब्रासोबत खेळायला लागला… काही सेकंदातच कोब्राने खेळ खल्लास केला, Video पाहून थरकाप उडेल

इथे पाहा व्हिडीओ

हा भन्नाट व्हिडीओ neptiktok नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका गाजला आहे की, ३ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “काय करतोय भावा, नवरा-नवरी तर खाली पडले.” नवरा-नवरीचा व्हायरल झालेला व्हिडीओ इतका मेजशीर आहे की, तुम्ही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाही. लग्न सराईचा सीजन सुरु असल्यानं काही ठिकाणी स्टेजवर नवरा-नवरीची फजिती झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वऱ्हाडी मंडळींसह लाखो नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण भर लग्नमंडपात नवरीला अशाप्रकारे खाली पडताना याआधी क्वचितच पाहिलं असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:13 IST

संबंधित बातम्या