man Criticize who throw garbage in Iron Bull Sculptures : पुण्यातील अनेक व्हिडिओ, फोटो, किस्से रोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पुण्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. काही बेशिस्त आणि बेपर्वा लोकांच्या वागण्यावर एक तरुण चांगलाच भडकला आहे. संतापलेल्या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत सर्वांना खडे बोल सुनावले आहेत. पुण्यात सुशोभिकरणासाठी महापालिकेतर्फे लोखडांचा पून्हा वापर करून सुंदर शिल्प तयार करण्यात आले आहेत. हे शिल्प पुण्याच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी उभारले आहेत पण पुण्यात काही असे लोकही आहेत ज्यांना याची कदर नाही. हे शिल्प फक्त सुशोभिकरणाची वस्तू नव्हे तर कलाकरांची कला आहे ज्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरी पदपथावरही असे काही शिल्प उभारण्यात आले आहेत पण काही बेशिस्त नागरिकांनी लोखंडापासून तयार केलेल्या बैलाच्या शिल्पामध्ये चक्क कचरा टाकला आहे. हा प्रकार पाहून एका तरुणाचा संताप अनावर झाला. म्हणूनच व्हिडिओ पोस्ट करत त्याने सर्व पुणेकरांनाच खडे बोल सुनावले आहेत.
व्हायरल व्हिडीओ abhayanjuu नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पाच्या आतमध्ये टाकलेला कचरा दाखवला आहे. त्यानंतर या तरुणाने सर्व पुणेकरांना विनंती केली की ही कचरा टाकण्याची जागा नाहीये ही शिल्पकला आहे. या लोखंडी बैलाच्या शिल्पाचे कान सर्जनशीलता वापरून बनवले आहेत ती कचरा टाकण्यासाठी वापरू नका. महापालिके खर्च करून शिल्प उभारले आहे त्यात कचरा टाकू नका. स्वत:च्या शहर तुम्ही स्वत: खराब करू नका.”
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की , “पुण्यात राहणाऱ्या सर्व मूर्ख लोकांना, ज्यांना कचरापेटी आणि शिल्पकला यातील फरक समजत नाही. वरील शिल्प आदरणीय छत्रपती संभाजी महाराज गार्डन, जेएम रोड, पुणे येथे ठेवले आहे. कृपया या शिल्पात कचरा टाकू नका. हे एका कलाकाराने बनवलेले एक सुंदर शिल्प आहे. हे तुमचे कचरा टाकण्याचे ठिकाण नाही.”
व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी बाहेरून पुण्यात येऊन राहणाऱ्या लोकांना दोष दिला तर लोकांच्या या वर्तणुकीवर टिका केली.
एकाने कमेंट की, मुळात पुण्यातील लोक त्या रस्त्यावर फिरकत सुद्धा नाही. तिथे बहुतांश लोक बाहेरून येणारी असतात आणि त्यांना या गोष्टी छान जमतात. बाहेरीव लोक शहरात येऊन ते स्वच्छ ठेवायचे सोडून घाण करतात.”
दुसऱ्याने कमेंट केली की,”ते कान बंद करा, कारण लोक फक्त साक्षर आहेत पण सुशिक्षित नाहीत”
तिसऱ्याने कमेंट केली की,”पुणे तिथे काय उणे”