scorecardresearch

ऐकावे ते नवलच! घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या अंगावर पडली वीज अन्…

‘मेलो नाही पण…’, असे कॅप्शन देत या व्यक्तीने स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऐकावे ते नवलच! घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या अंगावर पडली वीज अन्…
Photo : Social Media

मुसळधार पाऊस पडत असताना किंवा पाऊस पडण्याआधी जमा झालेल्या ढगांतून वीज कडकडण्याचा प्रचंड आवाज आपल्याला घाबरवतो. अशावेळी जर आपण बाहेर असू तर पटकन घर गाठण्याचा प्रयत्न करतो. पण कधी घरी असताना अशा जोरदार वीजा कडाडत असताना, आपण सुरक्षित घरात आहोत याचे आपल्याला समाधान वाटते. घरी आपण सुरक्षित आहोत असे प्रत्येकालाच वाटते. पण हे खोटे ठरवणारी घटना युनायटेड किंगडममध्ये घडली आहे. ही अचंबित करणारी घटना सध्या व्हायरल होत आहे.

ही घटना युनायटेड किंगडममधील आहे. इथे राहणाऱ्या एडन रोवन (३३ वर्ष) या व्यक्तीच्या घरात वीज कोसळली आणि त्यात तो जखमी झाला आहे. एडन रोवन घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या घरावर वीज कोसळली आणि तो यात जखमी झाला. ऑक्सफर्डला केलेल्या मेलमध्ये नेमकं काय घडलं हे एडन रोवरने सांगितले.

आणखी वाचा : काळ आला होता पण…; निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

एडन रोवनची इन्स्टाग्राम पोस्ट :

नेमकं काय घडलं?

५ सप्टेंबर रोजी, रात्री १०.३० वाजता एडन रोवन घरात व्हिडीओ गेम खेळत असताना अचानक त्याला कसलातरी मोठा आवाज ऐकू आला आणि काही कळायच्या आत त्याच्या शरीरात अत्यंत त्रासदायक वेदना जाणवू लागल्या. इंग्लंडमधील जॉन रॅडक्लिफ हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले, तेव्हा कर्मचार्‍यांनी सांगितले की त्याच्यावर वीज कोसळली आहे. त्याला आठ तास निरीक्षणात ठेवल्यानंतर औषधे देऊन डिस्चार्ज देण्यात आला.

Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

एडन रोवनने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यात त्याच्या हातावरील जखमा दाखवल्या आहेत. ‘ काही वृत्तपत्रांमध्ये माझा मृत्यू झाला असे सांगण्यात आले आहे, मी मेलो नाही पण अजुनही शरीरात सूज आहे आणि थकवा जाणवत आहे. जखमा बऱ्या होत आहेत, पण त्याचे चट्टे राहण्याची शक्यता आहे. त्यावर टॅटू काढण्याचा विचार सुरू आहे’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या