हंगेरी देशामधील एका व्यक्तीला विम्याची रक्कम मिळवण्यासाठी केलेल्या एका अजब कृत्यासंदर्भात दोषी ठरवण्यात आलं आहे. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपीने स्वत:चेच दोन्ही पाय कापल्याची माहिती समोर आली आहे. २.४ मिलियन पौंड म्हणजेच २४ कोटी रुपयांची विम्याची रक्कम मिळवण्यासाठी या व्यक्तीने स्वत:चे दोन्ही पाय ट्रेन अपघातात गमावल्याचा बनाव केला. यासाठी त्याने खरोखरच आयुष्यभरासाठी अपंगत्व स्वीकरलं पण नंतर हा बनाव उघड झाला अन् विम्याची रक्कम मिळण्याऐवजी आता त्याला शिक्षा सुनावण्यात आलीय.

विमा कंपनीने या दाव्यासंदर्भात शंका आल्याने न्यायालयात खटला दाखल केला. यावेळी कंपनीने विम्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मुद्दाम ट्रेनच्या ट्रॅकवर आपले पाय गमावल्याचा आरोप कंपनीने केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेला निकाल कंपनीच्या बाजूने लागला. २०१४ साली घडलेल्या या घटनेनंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात विम्याचे पैसे मिळतील अशी या आरोपीची अपेक्षा असल्यानं त्याने हे कृत्य केल्याचं न्यायालयाने मान्य केलं, असं ब्लिक नावाच्या वृत्तपत्राने म्हटलंय.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी या व्यक्तीने पूर्ण नियोजन करुन घडवून आणलेला हा सर्व प्लॅन अगदी योग्य पद्धतीने त्याने अंमलात आणला. अपघात इतका भीषण होता की या व्यक्तीच्या दोन्ही पायांचा गुडघ्या खालील भाग कापला गेला. ही व्यक्ती सध्या प्रोस्थेटीक म्हणजेच दिव्यांग वापरतात तसे प्लॅस्टीकचे पाय वापरते. तसेच ही व्यक्ती या अपघातापासून विलचेअरवरच आहे. या प्रकरणामधील व्यक्तीचं नाव सॅण्डोर सीएस. असं असल्याचं सांगितलं जात आहे. गावामधून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर मुद्दामून पडून या व्यक्तीने स्वत:चे पाय कापून घेतल्याचा दावा विमा कंपनीने युक्तीवादादरम्यान केल्याचं वृत्तपत्रांनी म्हटलंय.

या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांना तेव्हा शंका आली तेव्हा त्यांनी या व्यक्तीने अपघाताच्या एक वर्ष आधीचपासून त्याची तयारी सुरु केल्याचं जाणवलं. एका वर्षभरामध्ये या वक्तीने १४ हाय रिस्क लेव्हलचा विमा उतरवला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान केलेल्या खुलाश्यामध्ये सॅण्डोरने आपल्याला आपल्या आर्थिक सल्लागारांनी हा सल्ला दिल्याचं सॅण्डोर म्हणालाय. विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम ही बचत खात्यापेक्षा अधिक परतावा देते असंही आपल्याला सांगण्यात आल्याचं सॅण्डोरने म्हटलंय. अपघातानंतर सॅण्डोरच्या पत्नीने अर्ज केला असता कंपनीने त्याच्या अपघातासंदर्भात शंका उपस्थित करता हा अपघात विम्याच्या रक्कमेसाठी सॅण्डोरने घडवून आणल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली. इथूनच या प्रकरणाचा तपास सुरु झाला.

न्यायालयाने दोन्ही बाजू, पुरावे पाहिल्यानंतर या व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच चार हजार ७२५ पौंड म्हणजेच, ४ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम या खटल्यासाठी वकिलांनी घतलेली कायदेशीर फी म्हणून द्यावी, असं न्यायालयाने म्हटलंय. मागील तास वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं. अखेर या आरोपीने दोन्ही पाय गमावल्यानंतर आता त्याला शिक्षा सुनावण्यात आलीय.