या पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच

सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवणे हे काही एक दोन दिवसांचा खेळ नाही, असं आपण कित्येकदा बोलून जातो. पण सीक्स पॅक्स अ‍ॅब्स खरंच दोन दिवसात बनतात, असं आम्ही म्हटलं तर कदाचित तुम्हाला सुरूवातीला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

Six-Pack-abs
(Photo: Instagram/ dean.gunther)

प्रत्येकाला आपले शरीर बांधेसूद व पीळदार असावे असे वाटत असते. मात्र, त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टास बरेच लोक तयार नसतात. मॉडेल्स आणि चित्रपटातील अ‍ॅक्शन हिरोंना पाहून अनेकांना त्यांच्याप्रमाणे बॉडी बनवण्याची इच्छा होते. पण सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवणे हे काही एक दोन दिवसांचा खेळ नाही, असं आपण कित्येकदा बोलून जातो. पण सीक्स पॅक्स अ‍ॅब्स खरंच दोन दिवसात बनतात, असं आम्ही म्हटलं तर कदाचित तुम्हाला सुरूवातीला विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. एका व्यक्तीने हे शक्य करून दाखवलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जीममध्ये एब्स बनवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. व्यायाम करूनही तो निराश होतो. अ‍ॅब्स दिसत नसल्याने तो निराश होऊन तो डीन गुंथेर नावाच्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याला दाखवतो. डीन गुंथेर हा एक टॅटू आर्टिस्ट असून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याने हा व्हिडीओ शेअर केलाय. डीनने या व्यक्तीला अ‍ॅब्स बनवण्यासाठी मदत करण्यास होकार दिला. सुरूवातीला तो व्यक्ती त्याच्या आदर्श व्यक्तीचा फोटो दाखवतो.

आणखी वाचा : Viral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं? हे पाहून हसून-हसून दुखेल पोट

त्यानंतर डीन गुंथेर त्या व्यक्तीच्या पोटावर एक स्पेशल टॅटू बनवतो. अगदी दोनच दिवसात डीनने त्या व्यक्तीच्या पोटावरचा हा स्पेशल टॅटू पूर्ण केला. या स्पेशल टॅटूमुळे त्या व्यक्तीच्या पोटवर अगदी हूबेहूब सिक्स पॅक्स सारखाच भास होतो. डीनने याचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत त्याची कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवली. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘कृपया जिममध्ये जाणं बंद करू नका’ असं लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केलाय.

आणखी वाचा : VIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चिमुकल्या मुलाला कडेवर घेऊन पदवी घेण्यासाठी आली महिला, भावूक करणारा हा VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख १९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसून येत आहे. एका युजरने लिहिलं की, ‘पहिल्या नजरेत कुणी पाहिलं तर खरे अ‍ॅब्स आणि खोटे अ‍ॅब्स यात फरकच ओळखू शकणार नाहीत.’ तर अनेक युजर्सनी टॅटू आर्टिस्ट डिन गुंथेर याच्या कलाकृतीचं कौतुक केलंय. कित्येक युजर्सनी तर विश्वास होत नसल्याचं सांगितलंय. तर अनेकांनी ‘शानदार टॅटू’ असं म्हटलंय.

डीन गुंथेर हा टॅटू आर्टिस्ट हा ब्रिटेनमधल्या मॅंचेस्टर इथे राहतो. हूबेहूब दिसणाऱ्या टॅटू आर्टिस्टसाठी त्याला ओळखलं जातं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man gets six pack abs in two days know full story prp

Next Story
VIRAL NEWS : आफ्रिकेत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी मेंढ्याला तीन वर्षांचा तुरुंगवास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी