Man Bathing King Cobra Viral Video : किंग कोब्रा हा साप जगातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानला जातो. या सापाला पाहून भल्याभल्ल्यांना घाम सुटतो. याचा एक दंश झाला तर काही मिनिटांत माणूस खल्लास झालास म्हणून समजा. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही म्हणाल, ह्या माणसाला भीती वैगरे आहे की नाही. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाला पाण्याने अंघोळ घालताना दिसत आहे. व्हिडीओतील माणूस एवढा बिनधास्त आहे की, तो एखाद्या लहान मुलाला जशी अंघोळ घालतो तशाप्रकारे किंग कोब्राला अंघोळ घातलोय. (snake viral video)

हा व्हि़डीओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल, कारण ज्या सापाला बघून भल्या भल्यांची भिंबेरी उडते, त्या सापाच्या अंगावर हा माणूस अगदी सहजपणे बादल्या भरून पाणी टाकतोय. त्याच्या चेहऱ्यावर भीतीतर दूरचं चक्क हसू दिसत आहे. ट्विटरवर @TansuYegen अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ भारतातील एक गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ८ फूट लांबीचा साफ सरपट एका नळाजवळ फणा काढून उभा आहे. यावेळी एक व्यक्ती बादलीभर पाणी त्या सापाच्या अंगावर टाकतो. तरी तो साप काही न करता फणा काढून तसाच राहतो. काही वेळाने हा माणूस सापाच्या फणाला स्पर्श करतानाही दिसतो पण साप अजिबात कसलीही हालचाल करत नाही.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आत्तापर्यंत २.६४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. १० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे आणि अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे तरी तो तुफान व्हायरल होतोय.

अवघडच आहे राव! गुगलमध्ये नोकरी लागलेल्या व्यक्तीला भाड्याच्या घरासाठी द्यावी लागली मुलाखत, पुढे झाले असे की…

एका यूजरने या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लिहिले की, सापाला नेहमी उष्ण वातावरण हवे असते. जर तुम्ही त्याला आंघोळ घातली तर ते त्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, भाऊ, मला बघून भीती वाटतेय. पण हा व्यक्ती सापासोबत एवढ्या सहजतेने वागतोय, जणू काय तो एखाद्या मुलाला आंघोळ घालत आहे. बरं, काहीही झालं तरी सापांजवळ न गेलेलेच बरे आहे.