नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल? | Loksatta

नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल?

किंग कोब्रा सापाला आंघोळ घातल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे

नादच केला पठ्ठ्यानं! चक्क किंग कोब्रालाच घातली आंघोळ, श्वास रोखून धरणारा असा Viral Video यापूर्वी पाहिला नसेल?
एका तरुणाने चक्क किंग कोब्राचीच आंघोळ केली. (image-social media)

घरात पाळीव प्राण्यांवर प्रेम करणं अनेकांना आवडतं. मांजर, श्वानासारख्या प्राण्यांचे तर घरबसल्या लाड होतात. पण घरात अशीही काही माणसं असतात ज्यांना पाळीव नाही तर जंगली प्राण्यांची आवड असते. रानावनात भटकणाऱ्या काही प्राण्यांसोबत मैत्री करणं, एखाद्या वेळी चांगली गोष्ट ठरू शकते. पण सापांसोबत खेळणं म्हणजे मृत्यूच्या दारातच प्रवेश करण्यासारखं आहे. एका पठ्ठ्याने सामान्य जातीच्या बिनविषारी सापाला नाही तर चक्क किंग कोब्रालाच आंघोळ घातली आहे. जगातील सर्वात जास्त विषारी सापांपैकी एक समजल्या जाणाऱ्या किंग कोब्राला राहत्या घरात एकाने आंघोळ घातलीय. बाथरूम मध्ये किंग कोब्राला आंघोळ घालण्याचा थरार कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

एक व्यक्तीने किंग कोब्रा सापाला आंघोळ घातल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. बाथरूम मध्ये असलेल्या बकेटमधलं पाणी अगदी सहजपणे किंग कोब्राच्या अंगावर एक व्यक्ती टाकत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला हजारोंच्या संख्येत व्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. तसेच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावंही केला आहे.

नक्की वाचा – Tik Tok स्टार मेघा ठाकूरचं निधन, सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळं अवघ्या कलाविश्वात शोककळा

इथे पाहा व्हिडीओ

दिवसेंदिवस व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या माध्यमातून धक्कादायक प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. वाघ, सिंह, विषारी सापांसोबत खेळ करण्याचा घाटच काही लोकांनी घातल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्या काही जणांचा जीवघेण्या स्टंटबाजीत मृत्यूही झाला आहे. केवळ लाईक्स आणि लोकांची वाहवा मिळवण्यासाठी काही माणसं लाखमोलाचा जीव कवडीमोल करताना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 17:02 IST
Next Story
मुंबईमधील रिक्षाचालकाने चक्क ऐकवली युरोपीय देशांची यादी; Viral Video पाहून नेटकरीही झाले अवाक