स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ, केंद्रातील मोदी सरकारने अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ही मोहीम सुरू झाली असून २९ दिवसांपूर्वी भारतीय तटरक्षक दलाने खोल समुद्रात उतरून तिरंगा फडकवला होता, त्यानंतर हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या मधोमध एक व्यक्ती तिरंगा ध्वज फडकवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत देशभरात विविध ठिकाणी तिरंगा फडकवण्यास सुरुवात झाली आहे. हरिद्वारमध्ये एक व्यक्ती गंगा नदीच्या आत तिरंगा ध्वज फडकवताना दिसला. नदीतील ध्वजारोहणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर गंगा नदीच्या मध्यभागी या व्यक्तीने हातात तिरंगा घेतला आहे. दरम्यान, ती व्यक्ती प्रवाहासोबत पोहत पुढे जाताना दिसत आहे. त्या व्यक्तीला पाहण्यासाठी घाटावर मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

( हे ही वाचा: Viral Video; आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीण भिडली मगरीशी; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल)

( हे ही वाचा: जागरणमध्ये ढोल वाजवणार्‍या एका व्यक्तीने जिंकले लाखो लोकांचे मन, जस्टिन बीबरही झाला फॅन, पहा Viral Video)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ८,४०० हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ५०० हून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. तसंच ह्या व्हायरल व्हिडीओला वेगवेगळ्या कंमेंट देखील येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man hoists tricolor in river ganga at har ki pauri ghat in haridwar watch video gps
First published on: 04-08-2022 at 15:27 IST