Viral Video: मुंबईत पावसाचे पुनरागमन झाले असले तरीही अनेक राज्यात उष्णतेची लाट पसरलेली दिसत आहे. यावर उपाय म्हणून अनेक जण वेगेवगेळे जुगाड करताना दिसत आहेत. काही जणांनी घरात एसी, कूलर लावून घेतला आहे. तर अनेक जणांनी देसी जुगाड करून यावर उपाय शोधून काढले आहेत. उष्णतेमुळे हैराण होऊन तुमच्यातील अनेक जण ऑफिस किंवा शाळांमधून घरी आल्यावर थंड पाण्याने अंघोळ करतात. पण, आज एका पट्ठ्याने तर हद्दच केली आहे. त्याने चक्क त्याच्या दुचाकीला एक अनोखा शॉवर बसवून घेतला आहे.

व्हायरल व्हिडीओ राजस्थानच्या जोधपूरचा आहे. एक तरुण दुचाकी घेऊन फेरफटका मारताना दिसत आहे. पण, तुम्ही नीट पाहिलंत तर या व्यक्तीनं आपल्या दुचाकीवर एक पाण्याचे कॅन ठेवलं आहे. त्यामध्ये एक पाईप जोडला आहे. हा पाईप व्यक्तीच्या उंचीइतकाच आहे. तसेच या पाईपला एक नळ देखील लावला आहे. नळ उघडताच पाण्याच्या कॅनमधील पाणी पाईपद्वारे व्यक्तीच्या डोक्यावर पडते आणि त्याला थंडगार वाटते. अजब जुगाड करणाऱ्या तरुणाचा हा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…गर्दी, गोंधळ अन्… अखेर धावत्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी ‘हा’ निवडला मार्ग; पाहा थक्क करणार व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणाने जुगाड करून चालता-फिरता शॉवर दुचाकीला बसवून घेतला आहे. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतलेली दिसते आहे. त्याने पाण्याच्या कॅनमध्ये पाईप बसवून त्याला नळ जोडून घेतला आहे. नळ सुरु केल्यावर अगदी शॉवरप्रमाणे तरुणाच्या डोक्यावर पाणी पडताना दिसत आहे. तसेच हा अजब जुगाड घेऊन व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच शॉवर सुरु असणाऱ्या दुचाकीवर बसून तरुण थंडगार पेय पिऊन, मार्केटमध्ये इथे-तिथे फेरफटका मारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @snehamordani या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणाचा हा अजब जुगाड पाहून जोधपूरचे रहिवासी थक्क झाले आहेत. काही जण तरुणाकडे पाहून हसत आहेत. तर अनेक जण तरुणाकडे पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसले आहेत. तर बहुतांश जण त्यांच्या मोबाईलमध्ये हे अनोखं दृश्य कैद करताना दिसून आले आहेत. एकूणच तरुणाच्या या जुगाडाने जोधपूरच्या रहिवाशांबरोबर सोशल मीडियाच्या नेटकऱ्यांचे सुद्धा लक्ष वेधून घेतले आहे.