Man shocking video in metro: मुंबई लोकलच्या गर्दीची सवय आता अनेकांना झाली आहे. ट्रेनमध्ये फक्त चढायला मिळालं की बसं, मग माणसं त्या गर्दीत कसेही उभे राहून येतात. आता लोकलच्या गर्दीतून प्रवास करण्याऐवजी ज्यांना सोयीस्कर वाटते ते अनेक जण मेट्रोने प्रवास करतात. पण, मेट्रोतसुद्धा बसायला जागा मिळेल याची शाश्वती देता येत नाही.
सोशल मीडियावर आपण अनेकदा सीट मिळावी म्हणून भांडण करतानाचे व्हिडीओ पाहिलेच असतील. पण, सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका माणसाने सीट मिळावी म्हणून चक्क हद्दच पार केली. नेमकं घडलं काय, जाणून घ्या…
सीट मिळावण्यासाठी ओलांडली मर्यादा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मेट्रोतील भरगर्दीत एका माणसाला बसायला मिळालं नाही म्हणून तो तिथेच उभा आहे. आजूबाजूला महिला बसलेल्या असताना अचानक या माणसाचे शरीर जोरजोरात थरथरू लागतं. उभ्या उभ्याच तो माणूस अंगात कापरी भरतेय की काय अशा अवस्थेत जोरजोरात आपलं शरीर हलवतो. त्याला त्रास होतोय हे लक्षात येताच सीटवरील एक महिला तिथून उठते आणि तो माणूस त्या सीटवर जाऊन बसतो. सीटवर बसल्यानंतरदेखील त्याचं शरीर जोरजोरात हलत असतं.
हा व्हायरल व्हिडीओ @desi_patarkar_karmu_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “सीट लेने की लेटेस्ट टेक्नोलॉजी” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. खरोखरंच या व्यक्तीला काही आजार आहे की याने फक्त जागा मिळवण्यासाठी हा प्रॅंक केलाय हे अद्याप कळू शकले नाही. यादरम्यान, या व्हिडीओला तब्बल २.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “याला मिर्गीचा झटका म्हणतात.” तर दुसऱ्याने “हा कोणता आजार आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “जेव्हा खरंच असं होईल ना तेव्हा कळेलं की लोकांच्या भावनांशी खेळणं किती चुकीचं असतं ते.”
ह