Viral Video: 'जान जाये पर जूता न जाये', बुटांसाठी धावत्या ट्रेनसमोर मारली उडी अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात का? | man jumped in front of running train for his shoes rpf saves his life railway train shocking viral video latest update nss 91 | Loksatta

Viral Video: ‘जान जाये पर जूता न जाये’, बुटांसाठी धावत्या ट्रेनसमोर मारली उडी अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात का?

धावत्या ट्रेनसमोर तरुणाने उडी मारल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला.

Viral Video: ‘जान जाये पर जूता न जाये’, बुटांसाठी धावत्या ट्रेनसमोर मारली उडी अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहिलात का?
धावत्या ट्रेनसमोर तरुणाने मारली उडी

सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक तरुण जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करत असतात. इन्स्टाग्रामवर रील्स बनवून आपणच या युगातील स्टार्स आहोत, अशा अविर्भावात आताची युवापीढी राहताना दिसते. परंतु, सेल्फीच्या नादात, सोशल मीडियावर हिरो होण्याची इच्छा आकांशामुळं अनेकजण लाखमोलाचा जीव धोक्यातही टाकतात. असाच एक धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. बुटांसाठी एका तरुणानं धावत्या ट्रेनसमोर उडी मारून जीव धोक्यात टाकला. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – रिपोर्टींग थांबवण्यासाठी हत्तीने केले असे काही की…; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

नेमकं काय घडलं?

एका तरुणाने जीवाची पर्वा न करता रेल्वे ट्रॅकमध्ये उडी मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. क्षुल्लक गोष्टींसाठी ही तरुण मंडळी काय करतली याचा काही नेम राहिला नाही. बूट रेल्वे ट्रॅकमध्ये पडल्याने एका तरुणाने जीवघेणा स्टंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बूटांसाठी त्याने थेट रेल्वे ट्रॅकमध्ये उडी मारली, त्याचदरम्यान समोरून धावती ट्रेन आली. मात्र, रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता या तरुणाला मरणाच्या दारातून सुखरूप सोडवले. एक छोटी चूक त्याच्या जीवावर बेतली असती. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, असाच काहिसा प्रकार या ठिकाणी घडलेला व्हिडीओत दिसत आहे.

हा थरारक व्हिडीओ जिन्दगी गुलजार या नावाच्या युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक तरुण कवडीमोल बूटांसाठी लाखमोलाचा जीव धोक्यात टाकून रेल्वे ट्रॅकवरून प्लॅटफॉर्मवर येताना दिसतो. मात्र, याचदरम्यान त्याचे बूट रेल्वॅट्रकजवळ पडतात आणि ते उचलण्यासाठी तो खाली उतरतो. पण त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रेनची त्याला जराही भीती वाटत नाही आणि तो जीव धोक्यात टाकून हा कारनामा करतो.

आरपीएफने वाचवले प्राण

एक तरुण जेव्हा जीव धोक्यात टाकून रेल्वे ट्रॅकवर जातो, त्याचदरम्यान रेल्वे सुरक्षा दलातील एक अधिकारी तातडीनं त्याच्याजवळ धाव घेतो आणि त्याला प्लॅटफॉर्मवर खेचतो. या थरारक घटनेमुळं आरपीएफ त्या तरुणाचा प्रचंड राग येतो, परिणामी त्याला या चूकीसाठी मारहाणही करतो. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-11-2022 at 15:07 IST
Next Story
रिपोर्टींग थांबवण्यासाठी हत्तीने केले असे काही की…; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू