scorecardresearch

Premium

तरुणाचे Apple AirPods गटरात पडले; क्षणाचाही विचार न करता थेट नाल्यात मारली उडी अन्…खतरनाक VIDEO व्हायरल

Viral video: कल्पना करा की अॅपलचे एखादे प्रोडक्ट तुमच्याकडून हरवले?

Man Jumps Into Sewer To Save His AirPods
Apple AirPods गटरात पडले (फोटो – इन्स्टाग्राम)

Video viral: अॅपलची प्रत्येक वस्तू इतकी महाग आहेत की एखादे छोटेसे उत्पादनही गायब झाले तर खूप वाईट वाटते. अॅपल कंपनीची कोणतीही गोष्टी खरेदी करायची म्हटल्यावर भरपूर पैसे लागतात. त्यामुळे प्रत्येक जण अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट असूदेत त्याला जिवापेक्षा जास्त जपतात. कितीही लहान प्रोडक्ट असूदेत उदा, अॅपलचे एअरपॉड्स, लहान असले तरी किंमत हजारांच्या घरात आहे. त्यामुळे ऍपलचे उत्पादन खरेदी केल्यानंतर प्रत्येकजण ते मोठ्या काळजीने ठेवतो. कल्पना करा की हेच अॅपलचे एखादे प्रोडक्ट तुमच्याकडून हरवले? कल्पानाही करवत नाही ना..मात्र एका तरुणासोबत असंच काहीसं घडलंय. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका व्यक्तीचे अॅपलचे एअरपॉड गटरता पडले. त्याची काय हालत झाली असेल याचा विचार करा. पुढच्याच क्षणी तो काय करतो याचा व्हिडीओ समोर आलाय.

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, रस्त्यावरुन चालताना एका व्यक्तीच्या कानातून चुकून एअरपॉड्स गटरात पडतात, यानंतर पुढच्याच क्शणी कशाचाही विचार न करता हा व्यक्ती नाल्यात उडी मारतो आणि एअरपॉड्स उचलतो आणि काही सेकंदात बाहेर येतो. यादरम्यान तो शेजारून जाणाऱ्या इतर लोकांशी बोलताना दिसत आहे. त्या व्यक्तीने उघड्या, गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त गटारात कशी उडी मारली हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकालाच आश्चर्य वाटले की कोणी असे कसे करू शकते.

You Will Tremble After Watching This Video
बापरे! हा व्यक्ती स्वत:च्याच बोटांवर कोयत्याचे वार करतोय; VIDEO पाहून उडेल थरकाप
wife cooks anything dish for husband as a dinner
Video : जशास तसे उत्तर! बायकोने ‘काहीही चालेल’वर शोधला तगडा उपाय….
Marathi actor kiran mane talk about mahatma gandhi
“खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका झालाय” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…
raveena tandon grandson birthday
“माझ्या प्रिय बाळाच्या बाळाला…”, नातवासाठी आजी रवीना टंडनची खास पोस्ट; गोंडस फोटो केले शेअर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: हृदयद्रावक! गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडिया यूजर्सनीही या व्यक्तीचे कौतुक केले आहे. तर काही लोकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. एका युजरने कमेंट केली की लोक फार कमी पैशात गटर साफ करतात. दुसर्‍या युजरने लिहिले की, लोक इतक्या प्रमाणात वेडे आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man jumps into sewer to save his airpods apple fan says i would do the same video viral srk

First published on: 25-09-2023 at 11:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×