आत्तापर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये जोडप्यांचे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत होते. कधी मारामारीचे व्हिडीओही पाहायला मिळत होते; पण यावेळी असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून मेट्रोमध्ये हे सगळं कधी सुरू झालं असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीने अगदी आरामात कसलीही काळजी न करता बिडी पेटवली आणि ओढण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिडी ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोमध्ये सीटवर बसून एक व्यक्ती बिडी ओढत आहे. त्या व्यक्तीभोवती अनेक लोक बसलेले असतात, पण त्याच्या या कृत्यावरून कोणीच काही बोलत नाही. ती व्यक्तीही कसलीही फिकीर न करता बिडी ओढत राहते. ती व्यक्ती मेट्रोत नाही तर घरात बसल्याप्रमाणे वागतेय.

दिल्ली मेट्रोमध्ये कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मेट्रोमध्ये असे करताना कोणी आढळल्यास शिक्षा आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. मात्र, कसलीही भीती न बाळगता ही व्यक्ती बिडी ओढतेय.

लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडलं अघटित! फायर क्रॅकरने अचानक घेतला पेट अन्…; VIDEO व्हायरल

इन्स्टाग्रामवर @DelhimeriJaan नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काका बिडी आणि माचिस घेऊन मेट्रोत कसे घुसले असे अनेकांचे म्हणणे आहे; तर मेट्रो स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची पूर्ण तपासणी करून सोडले जाते. त्याच वेळी काही लोकांनी सांगितले की, काकांना दंड ठोठावला तर असा थाट एका मिनिटात संपेल.