The Pizza Diet Viral Video : वजन कमी करण्यासाठी सकस आहाराची गरज असते. जंक फू़ड, गोड पदार्थ तसेच तळलेले पदार्थ खाणे अनेक जण टाळतात. कारण शरीरात अतिरिक्त कॅलरीजची भर पडली की, लठ्ठपणाला समोरं जावं लागतं. पण उत्तर विभागातील आर्यलॅंड देशातील एका व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. पिझ्झा आरोग्यासाठी घातक असतानाही काही लोक पिझ्झा खाणे खूप पसंत करतात. इटालियन फूडमधील पिझ्झात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. तसंच पिझ्झामध्ये फॅट आणि सोडियम असल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढतं. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. पण एका व्यक्तीने दिवसातून तीनवेळा पिझ्झा खाऊन वजन कमी केल्याचा दावा केला आहे. रीयान मर्सर असं या व्यक्तीचं नाव आहे. रीयान एक पर्सनल ट्रेनर असून त्याने ३० दिवसांत वजन कमी करण्याचं आव्हान पेललं.

ब्रेकफास्ट,लंच आणि डीनरमध्ये रीयान पिझ्झाचं सेवन करायचा. जवळपास साडेतीन किलो एवढी क्वाटिंटी असलेल्या पिझ्झाचे सेवन रीयानने केलं असल्याची माहिती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. वजन कमी करण्याचा प्रवास त्याने या स्टोरीच्या माध्यमातून
शेअर केला आहे. त्याने पोस्टमध्ये वजन कमी करण्याबाबत दावा करत म्हटलंय, पिझ्झा खाल्ल्याने शरीरातील फॅट लेव्हल कमी होत असल्याचं ६ मिलियनहून अधिक लोकांना कळालं असेल. जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असतं, त्यावेळी तुमही तुमच्या आवडीचे पदार्थ खाणे टाळता. पण अशाप्रकारे पदार्थांच सेवन तुम्हीही करावं, यासाठी मी पिझ्झा डाएट सुरु केलं. पिझ्झा डाएटबाबत जनजागृती करण्याचा माझा मानस होता.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
man opts for papaya over cake on birthday
व्यक्तीने वाढदिवशी केकऐवजी कापली पपई, पण का? नेटकऱ्यांना पडला प्रश्न, व्हिडीओ तुफान व्हायरल
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच

नक्की वाचा – चांगलं आरोग्य हवंय मग दररोज खा ‘इतके’ काजू, दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने होतात हे फायदे

इथे पाहा व्हिडीओ

पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी अशाप्रकारचा डाएट सुरु करून रीयानने मसल्स वाढवले. पिझ्झा खाल्ल्यानेही शरीरातील फॅट कमी होऊ शकतं. यासाठी रीयानने पिझ्झा खाण्याचं आव्हान स्विकारलं. मोठ्या प्रमाणात कॅलरीज असणारे इतर जंक फूड खाणं रीयानने बंद केलं. कारण त्याला पिझ्झा खाल्ल्यावर वजन किती कमी होऊ शकतं, यावर रिसर्च करायचा होता. दिवसातून तीनवेळा पिझ्झा खाल्ल्याने वजन कमी झालं, असा दावा रियानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे. “वजन कमी करण्यासाठी मी नेहमी वर्कआऊट करण्यासाठी जिममध्ये जातो आणि 10 हजार स्टेप्स चालतो,” असंही त्याने म्हटलं आहे.