scorecardresearch

रेल्वे स्टेशनवर या मुलाने अशी जबरदस्त उडी घेतली अन्…., पाहा हा VIRAL VIDEO

या मुलाचा कारनामा पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाने रेल्वे स्टेशनवर अशी जबरदस्त उडी घेतलीय, की पाहणारे केवळ पाहातच राहिले. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी त्यावर टिका देखील केलीय.

Man-Jump-Video-Viral
(Photo: Instagram/ pkfrtv)

जगात एकापेक्षा एक असे कितीतरी लोक आहेत. प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट आहे आणि ते जगासमोर येतं ते व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून…जगात कौशल्याची काही कमतरता नाही. सोशल मीडिया हे आज एक असं माध्यम बनलंय, जिथं असे प्रतिभावान लोक रोज व्हायरल व्हिडीओद्वारे भेटत असतात. यातील काही व्हिडीओ इतके अप्रतिम असतात, की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या एका तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या मुलाचा कारनामा पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाने रेल्वे स्टेशनवर अशी जबरदस्त उडी घेतलीय, की पाहणारे केवळ पाहातच राहिले. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी त्यावर टिका देखील केलीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदा तरी सुपरमॅनची आठवण नक्कीच येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मुलाने रेल्वे स्टेशनच्या एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर इतकी जबरदस्त उडी घेतलीय की पाहणारे तोंडात बोट घालतील. डोळ्याची पापणी लवण्याच्या आत हा मुलगा रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना दिसून येतोय. यात मुलाने ज्या पद्धतीने बॅलन्स ठेवला तो देखील वाखाणण्याजोगा आहे. प्लॅटफॉर्मवर कुठून उडी घ्यायची आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कुठे लॅण्ड व्हायचं हे या मुलाला चांगलंच माहिती होतं.

या व्हिडीओच्या दुसऱ्या क्लिपमध्ये हा मुलगा चक्क स्पायडरमॅनच्या वेशभूषेत दिसून येतोय. यामध्ये सुद्धा हा मुलगा जणू काही वाऱ्याची झुळूक वहावी अशाच पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरून उडी घेताना दिसून येतो आणि थेट पुढे निघून जातो. हे पाहून प्लॅटफॉर्मवरून ये जाणारे इतर प्रवासी देखील हैराण होत हे पाहू लागतात. अचानक स्पायडरमॅन सारखा दिसणारा कुणीतरी वेगाने झेप घेत रेल्वे ट्रॅक क्रॉस करतो आणि डोळ्यादेखत निघून जातो, हा इतर प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच होता. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे असतात.

आणखी वाचा : अनोखी कला! ही मुलगी चक्क दोन्ही हातांनी लिहिते, VIRAL VIDEO पाहून आश्चर्यचकित व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हात नसतानाही हा व्यक्ती बनवतोय चाउमीन; VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल

आश्चर्याचा धक्का देणारा हा व्हिडीओ pkfrtv नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की तो शेअर केल्या केल्याच सोशल मीडियावर व्हायरल देखील होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख २८ हजारांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच आतापर्यंत ६७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत. एका युजरने तर थेट कमेंटमध्ये विचारलंय की, ‘याचे वडील ब्रूसली तर नव्हते ना…’. तर काही युजर्सनी या व्हिडीओवर टिका देखील करण्यात सुरूवात केलीय. ‘जर अचानक या रेल्वे ट्रॅकवरून एखादी ट्रेन आली असती तर ते किती जीवघेणं ठरलं असतं’ असं या व्हिडीओवर म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man made an amazing jump at the railway station people shoocked after see the viral video prp

ताज्या बातम्या