सोशल मीडियावर दररोज काही ना काही धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. आजकाल लोक मार्केटिंगसाठीही सोशल मीडियाची मदत घेऊ लागले आहेत. आज माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट बाजारात उपलब्ध आहे ज्यामुळे त्याचे काम सोपे होऊ शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस अवघ्या २ मिनिटांत सिक्स पॅक ॲब्स बनवताना दिसत आहे. आता हे कसं शक्य झालं हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा.

तरूणांमध्ये सलमान खान, ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींसारखी बॉडी बनवण्याचं क्रेझ असतं. त्यांच्यासारखे ‘सिक्स पॅक अॅब्स’ असावे अशी प्रत्येक तरूणांची इच्छा असते. त्यासाठी अनेक तरूण जीम, हेवी डाएट आणि प्रोटीन्सचा आधार घेतात. पण मेहनत करूनही अनेकांना यात यश मिळत नाही. मग या तरुणानं केलेला जुगाड तुम्हीही करा.

तरुणानं केलेला जुगाड एकदा नक्की ट्राय करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं फक्त २ सेकंदात सिक्स पॅक ॲब्स कसे बनवले हे दिसत आहे. सिक्स पॅक ॲब्स होण्यासाठी लोकांना महिने लागतात आणि खूप मेहनतही करावी लागते. मात्र या व्यक्तीने फक्त २ सेकंदात सिक्स पॅक ॲब्स बनवले आहेत? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. थांबा एवढे अवाक् होऊ नका, हे शरीर मेहनतीने तयार केलेलं नाहीये तर त्या माणसाकडे बनावट ऍब्स कव्हर आहे जे तो त्याच्या अंगावर घालतो आणि त्याला फक्त २ सेकंदात सिक्स पॅक ऍब्स मिळतात. ती व्यक्ती एका कुस्तीपटूसारखी दिसते, जो विंगमध्ये उभे असताना त्याचे बनावट शरीर दाखवत आहे. या व्यक्तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: घरात वॉशिंग मशीनचा वापर करत असाल तर सावधान! कपडे धुताना व्यक्तीचा ३ सेंकदात अंत, नेमकं काय घडलं?

@TheFigen_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ८.८ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडिओला ७ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… काय मूर्खपणा आहे. लोकांना वेडे बनवले जात आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… सिक्स पॅक ऍब्स बनवण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले…भाऊ, पोटाची चरबी २ सेकंदात कमी करण्याची काही युक्ती आहे का?