Fan jugad video: काही वर्षांपासून वीजबिलांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की, ३०० ते ४०० रुपयांच्या आसपास जरी बिल आलं तरी खूप जास्त वाटायचं; पण आता तर अनेकांच्या घरात १२०० ते २००० रुपयांपर्यंत बिल येताना दिसतंय. अशा परिस्थितीत एका तरुणानं भन्नाट तोडगा शोधून काढला आहे; त्यानं जुगाड करून चक्क विजेशिवाय चालणारा पंखा तयार केला आहे. पण, तरुणाचा हा जुगाड पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा पंखा तयार करण्यासाठी दोन लाकडी पट्ट्या घेतल्या. तीन नट बोल्ट घेतले, पंख्याची पाती घेतली आणि ३ रबर घेतले. आता सर्वात आधी त्या लाकडी पट्ट्यांपासून अधिकचं चिन्ह तयार करा. मग आडव्या पट्टीच्या दोन्ही बाजूस आणि उभ्या पट्टीच्या वरच्या बाजूस असे तीन नट बोल्ट लावा. मग या खिळ्यांमध्ये तीन रबर लावा. आणि शेवटी मधल्या खिळ्यावर पंख्याची पाती फिक्स करा. बस्स! अन् एकदा काय हा पंखा फिरू लागला की मग दिवसभर फिरला तरी देखील थकणार नाही.मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली आहे. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. पण असेही काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ adeel_balouch या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, हे फक्त भारतीयच करु शकतात असं लिहलं आहे.