जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार? | Loksatta

जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?

दोघींचे अतुलसोबतचे प्रेमसंबंध घट्ट झाले आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, कारण…

जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न केल्यानं चर्चा रंगली आहे. (image-social media)

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या माळसिरस तालुक्यात एका विवाह सोहळ्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालून लग्नबंधनात अडकतात, भारतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे. पण मुंबईतील दोन जुळ्या बहिणींनी अकलूजमध्ये एकाच तरुणासोबत लग्न केल्यानं या विवाहाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. माळशिरस तालु्क्यातील अतुल नावाच्या तरुणासोबत दोन बहिणींनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, कांदिवलीत राहणाऱ्या रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं या नवरदेवाला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आयपीसीच्या ४९४ कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. राहुल नावाच्या व्यक्तीनं यासंबंधी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजते.

अकलूज येथील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात हा विविह सोहळा पार पडला. रिंकी आणि पिंकीने अतुलसोबत विवाह अनोखा विवाह केल्यानं सर्वत्र चर्चा रंगली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अतुल माळशिरस तालुक्यातील रहिवासी असून मुंबईत त्याचा व्यवसाय आहे. तर या दोघी बहिणी उच्चशिक्षित असून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे.

नक्की वाचा – Optical illusion Photo: अशा फोटोंमुळेच बुद्धीला कस लागतो, मग शोधा पाहू काळ्या-सफेद रेषांमध्ये लपलेला इंग्रजी शब्द

रिंकी आणि पिंकीच्या आईचा आजारी असताना अतुलने सांभाळ केला. त्यानंतर दोघींचे अतुलसोबतचे प्रेमसंबंध घट्ट झाले आणि विवाह करण्याचा निर्णय घेतला, अशीही माहिती आहे. दोन्ही बहिणी एकमेकींची काळजी घेतात. दोघी एकमेकांची काळजी घेतात. त्यामुळं दोघींनी वेगवेगळे विवाह करण्याचं ठरवलं नव्हतं. शेवटी त्यांनी एकाच तरुणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याची चर्चा असल्यानं याला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 10:05 IST
Next Story
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच