Man masturbating in metro viral video: रेल्वे, मेट्रो अशा सार्वजनिक ठिकाणीदेखील विकृत माणसांची हिंमत वाढत चालली आहे. कोणाचाही विचार न करता अनेक जण आपली मनमानी करतात आणि अशा ठिकाणी अश्लील कृत्य करतात. सध्या अशीच एक घटना एका मेट्रोमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अहमदाबाद मेट्रोमधील एका धक्कादायक घटनेने सार्वजनिक रोष निर्माण केला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक वर्तनाबद्दल चिंता निर्माण केली आहे. या घटनेत गर्दीने भरलेल्या मेट्रो डब्यात महिला प्रवाशांसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य केले म्हणून वस्त्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Man jugaad for a seat in metro prank viral video on social media
सीट मिळावी म्हणून ओलांडली मर्यादा! तरुणाने भरमेट्रोत ‘असं’ काही केलं की महिलांनी जागाच सोडली, पाहा VIDEO
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Viral Video Shows Parents Love For Their Childrens
पालकांचे ऋण फेडणे कठीण…! हॉस्टेलला जाणाऱ्या लेकराची बॅग भरणारे आई-बाबा; VIRAL VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा

हेही वाचा… असा मुलगा नसलेलाच बरा! भररस्त्यात मुलाचं संतप्त कृत्य, आईला कानाखाली मारलं अन्…, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का; पाहा VIDEO

नेमकं प्रकरण काय?

गुजरात समाचारच्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी सकाळी कालुपूर स्थानकातून निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन TE0008 डब्बा L4 मध्ये घडली. मेट्रोच्या डब्यातील प्रवाशांमध्ये अनेक महिला आणि तरुण मुलींचा समावेश होता. या महिलांसमोरच मेट्रोमध्ये टी-शर्ट घातलेला आरोपी अश्लील कृत्य करत होता. यादरम्यान काही तरुणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्यक्तीने आपले वर्तन सुरूच ठेवले.

एका त्रासलेल्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केला आणि थलतेज मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर एसआरपी चौकीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. तातडीने कारवाई करत मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. त्यांनी आरोपीला दूरदर्शन केंद्र स्थानकात पकडून पुढील कारवाईसाठी वस्त्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा… एवढी हिंमत येतेच कुठून? स्वत:च्या बायकोसमोर शेजारी तरुणीसोबत केलं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून बसेल धक्का

पोलिस काय म्हणाले?

हिमांशू वर्मा, डीसीपी झोन ​​१ यांनी पुष्टी केली, “ही घटना बुधवारी सकाळी घडली आणि मेट्रो अधिकाऱ्यांनी गुरुवारी आरोपीला आमच्या ताब्यात दिले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”

वस्त्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते आरोपीबद्दल माहिती गोळा करत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा माणूस क्लिनर म्हणून काम करतो आणि कदाचित तो मानसिक आजाराने ग्रस्त असावा. चौकशीदरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता निर्माण करणारे वर्तन पाहिले. वैद्यकीय मूल्यमापनांसह पुढील तपासांमुळे या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे.”

सध्या आरोपीची ओळख उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रवाशांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी मेट्रो सुरक्षा प्रोटोकॉलचे पुनरावलोकन करत आहेत.