iPhone 14 Online Order On Flipkart: ऑनलाईन शॉपिंगमधून धोका मिळाल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. मोबाईल लॅपटॉप विकत घेतला तर साबण मिळाला, ड्रेस ऑर्डर केला तर भलत्याच मापाचा मिळणार अशी उदाहरणे पाहून तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करण्याचा धसका घेतला असेल तर ही बातमी तुमचं मत नक्की बदलेल. अलीकडेच एका व्यक्तीला Flipkart वर iPhone 13 ऑर्डर केला असताना अनपेक्षितपणे iPhone 14 डिलिव्हर केला गेला. बसला ना धक्का? पण DigitalSphereT या ट्विटर युजरने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४ ऑक्टोबरला DigitalSphereT या ट्विटर युजरने ट्वीट करून माहिती दिली आणि म्हंटले की माझ्या एका फॉलोवरने फ्लिपकार्टवर iPhone 13 ऑर्डर केला होता जेव्हा त्याला फोनची डिलिव्हरी मिळाली तेव्हा iPhone 13 ऐवजी iPhone 14 मिळाला. या ट्विटला आतापर्यंत ८ हजाराहून अधिक लाईक्स व ५०० हुन अधिक रिट्विट मिळाले आहेत.

अनेकांनी या ट्वीटवर कमेंट करून चुकून का होईना iPhone 14 मिळाला म्हणजे त्या माणसाचे नशीब किती जोरावर असणार असे म्हंटले आहे तर काहींनी यावरून आयफोनला निशाणा करत बघा तुमचे फोन इतके एक सारखे आहेत की डिलिव्हरी करणाऱ्यांना १३ व १४ मध्ये फरकच लक्षात आला नाही असेही म्हंटले आहे.

विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?

दरम्यान यापूर्वी अहमदाबाद च्या यशस्वी शर्माला फ्लिपकार्टवरून लॅपटॉप ऑर्डर केल्यावर डिलिव्हरी बॉक्स मध्ये साबणाची वडी मिळाली होती. विशेष म्हणजे याबाबत तक्रार केल्यावर कंपनीने यशस्वी हिच्या तक्रारीला अमान्य केले होते. कंपनीने आपल्या नो रिटर्न पॉलिसीचा नियम दाखवत यशस्वीला लॅपटॉप देण्यास नकार दिला होता. एकीकडे हे प्रकरण चर्चेत असताना आता या व्यक्तीने चुकून मिळालेला आयफोनही परत करायला नको असे सर्वांकडून सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man ordered iphone 13 got iphone 14 from flipkart watch tweet by digitalspheret svs
First published on: 07-10-2022 at 13:11 IST