World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. उत्साहाने भरलेल्या आणि रंजक सामन्याचा चाहत्यांनी पुरेपुर आनंद लुटला. शेवटच्या विकेटपर्यत अनेकांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. खेळाडूंसह चाहत्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान जेव्हाही भारताचा सामना असतो तेव्हा चाहते सामना भारताने जिंकावा यासाठी काही ना काही जुगाड करतात. कोणी ‘लकी’ टीशर्ट घालून बसतात तर कोणी ‘लकी’ जागेवर बसतात. असे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. अशाच एका चाहत्याने भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान २४० अगरबत्या स्विगीवरून इंस्टाग्राम ऑर्डर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत जिंकावा यासाठी ठाण्यातील एक चाहता अध्यात्मिक मार्गाने प्रयत्न करत होता. त्याने भारत-न्युझिलंडच्या सामन्यादरम्यान २४० अगरबत्ती लावल्या होत्या. या ऑर्डर करण्यासाठी त्याने स्विगीच्या इन्स्टामार्ट सेवेचा वापर केला होता. हे स्विगीने त्यांचे अधिकृत एक्स(ट्विटर) अकांउट हायलाइट केले होते.

हेही वाचा – World Cup 2023 : भारत-न्यूझीलंड सामन्यात ‘वडापाव’ का होतोय ट्रेंड; संतापले रोहित शर्माचे चाहते ?

त्वरित व्हायरल झालेल्या स्विगीच्या पोस्टला प्रतिसाद देत gordonramashray या अकाउंटवरून या चाहत्याने त्याच्या मोठ्या ऑर्डरची कबुली दिली तेव्हा त्याने विनोदीशैलीत त्याचा खुलासा केला. त्याने उत्तर दिले की, ”माझ्या कृतीमुळे संपूर्ण परिसर धुर झाला होता. मी असे केले कारण त्याने भारताला विजय मिळावा” अशी इच्छा ‘प्रगट’ केली होती. त्याने सोबत एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने एका बटाट्यामध्ये अगरबत्या लावल्याचे दिसते आहे. हे सर्व टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर होत आहेत.

हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. एकाने या चाहत्याला “मॅनिफेस्टर ऑफ द मॅच” असे नाव दिले. दुसर्‍या वापरकर्त्याने कृतज्ञता व्यक्त केली आणि असे सुचवले की, “चाहत्यांचे प्रयत्न विस्मरणीय विजयात योगदान देणारे आहेत.”

हेही वाचा – टीम इंडियाच्या विजयानंतर धोनीचं ‘हे’ ट्वीट व्हायरल; रवींद्र जडेजाचा उल्लेख आणि मिश्किल टिप्पणी!

विश्वचषक सामन्यातील भारताची कामगिरी अप्रतिम राहिली असून, त्यांनी स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. विराट कोहलीने त्याचे ५- वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक झळकावून विजयात भर टाकली, या शानदार ११७ धावांच्या खेळीने सचिन तेंडुलकरचा पुर्वीचा ४९ शतकांचा विक्रम मोडला.

गेल्या दोन विश्वचषकांमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंडने ३९८ धावांच्या मोठे लक्ष्य पूर्ण करताना चांगली लढत दिली. डॅरिल मिशेलच्या १३४ धावांची दमदार खेळी करूनही ते शेवटी कमी पडले आणि भारताच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man orders 240 incense sticks from swiggy on world cup semi final day heres why snk
First published on: 17-11-2023 at 01:38 IST