सध्या सर्वत्र ऑनलाईन सेलची चर्चा सुरू आहे. सणांच्या काळात सुरू असणाऱ्या या सेलमध्ये स्वयंपाक घरातील वस्तुंपासून अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर मोठी सूट देण्यात येत आहे. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर तर ७० ते ८०सूट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर या ऑनलाईन सेलमधून ऑर्डर करत आहेत. असाच ऑनलाईन सेलचा फायदा घेण्यासाठी केलेली एक ऑर्डर सध्या व्हायरल होत आहे.

यशस्वी शर्मा या आयआयएम-अहमदाबादच्या विध्यार्थ्याने फ्लिपकार्ट ‘बिग बिलियन डे’ सेलमधून लॅपटॉप ऑर्डर केला पण त्याला एका वेगळ्याच गोष्टीची ऑर्डर मिळाली आहे. यशस्वीने याचा फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे. त्याने फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डे सेल’मधून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला होता. पण जेव्हा ते घरी डिलीवर करण्यात आले आले तेव्हा त्यात लॅपटॉपऐवजी असंख्य डिटर्जंट साबण आढळून आल्याने त्याला धक्काच बसला.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?

आणखी वाचा : हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच

यशस्वीने शेअर केलेले फोटो :

आणखी वाचा : आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण

यशस्वीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हे ऑर्डर त्यांच्या वडिलांनी घेतली असल्याचे सांगितले आहे. त्याच्या वडिलांना फ्लिपकार्टच्या ‘ओपन बॉक्स डिलीवरी’ हा कॉन्सेप्ट माहित नव्हता. यामध्ये ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तु चेक करून डिलिवरी बॉयला ओटीपी देणे अपेक्षित असते. पण त्याच्या वडिलांना ऑर्डर मिळताच ओटीपी द्यायचा असतो असे वाटल्याने त्यांनी तसे केले आणि त्यानंतर ऑर्डर उघडल्यावर त्यात लॅपटॉप नसल्याचे त्यांना समजले.

कमेंट विभागात त्याने नातेवाईकांनी या संबंधित पुराव्यांसह पोलिस तक्रार दाखल केली आहे हे अपडेट दिले आहे. यासह रिफण्ड प्रक्रिया सुरू झाली आहे हे कळवण्यासाठी फ्लिपकार्ट टीमने त्याच्याशी संपर्क साधला असल्याचे त्याने सांगितले.

फ्लिपकार्टचं म्हणणं काय?

ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून फ्लिपकार्ट ग्राहकांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देते. आमच्या ग्राहकांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट ऑनलाइन खरेदी अनुभव सुनिश्चित करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय ऑफर केलेल्या या विशिष्ट प्रकरणात, ग्राहकाने पॅकेज न उघडता डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसोबत OTP शेअर केला.घटनेच्या तपशीलांची पडताळणी झाल्यानंतर, आमच्या ग्राहक सेवा टीमने पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली. जी ३-४ दिवसांत पूर्ण होईल. आम्ही समस्या ओळखली आहे आणि चुकीच्या विक्रेत्यावर कारवाई देखील सुरू केली आहे. फ्लिपकार्टचा ओपन बॉक्स डिलिव्हरी हा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समर्पित उपक्रम आहे. ओपन बॉक्स डिलिव्हरी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, फ्लिपकार्ट विशमास्टर्स (डिलिव्हरी पार्टनर) ग्राहकासमोर डिलिव्हरीच्या वेळी उत्पादन उघडतात. ग्राहकांनी त्यांच्या ऑर्डर अखंड स्थितीत असतानाच डिलिव्हरी स्वीकारणे आवश्यक आहे आणि नंतर OTP शेअर करणे आवश्यक आहे. हे ग्राहकाच्या कोणत्याही आर्थिक दायित्वास प्रतिबंध करते. ग्राहकांचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी आणि एक उत्कृष्ट पुरवठा साखळी तयार करण्यासाठी फ्लिपकार्टने गेल्या काही वर्षांत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा हा भाग आहे.