Snake Attack Viral Video : काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने सापाची शेपटी पकडून रील बनण्याचा नाद केला. परंतु, पिसाळलेल्या सापाने जेव्हा तरुणाच्या अंगावर उडी मारली तेव्हा मात्र त्याचा अंगावर काटा उभा राहिला. सापाची शेपटी पकडणं या तरुणाला चांगलंच महागात पडल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

सापाचा हा थरारक व्हिडीओ mr_vsg नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला धक्कादायक कॅप्शनही देण्यात आला आहे. ‘मी प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगतो,’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Salute to stubbornness of girl
तुझ्या जिद्दीला सलाम! दोन्ही हात नसणारी तरुणी इतरांच्या हातावर काढतेय सुंदर मेहेंदी, VIDEO एकदा पाहाच
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
a man cracking coconut with his head shocking video goes viral
धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

नक्की वाचा – Video : सिंहिण अन् बिबट्यात WWE चा थरार, सिंहिणीने उचलबांगडी केल्यावर बिबट्या चढला झाडावर, पण…

इथे पाहा व्हिडीओ

सर्पदंशाने काही माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सापांसोबत खेळ करणं काही जणांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. विषारी सापांसोबत रील बनवताना काही तरुणांचा दंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असे असतानाही काही तरुण सापांसोबत खेळ करण्याचा नाद सोडत नाहीत. परिणामी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सापांपासून दूर राहणू स्वत:च्या जीवाचं रक्षण करण्यासाठी वन विभागाकडून लोकांना नेहमीच सूचना दिल्या जातात. पण काही माणसं जंगलात जाऊन नियमांची पायमल्ली करतात आणि सापाचे शिकार होतात.