'हेलिकॉप्टर भेळ' कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच! | man prepares helicopter bhel video goes viral prp 93 | Loksatta

‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

तुम्ही भेळचे अनेक प्रकार खाल्ले असतील.. पण ही कसली भेळ आहे जी हेलिकॉप्टरसारखी आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!
(Photo: Instagram/ trollgramofficial)

जत्रेतील आवडता पदार्थ म्हणजे भेळ…अगदी सगळीकडे आवर्जून मिळतेच अन चव भन्नाट असल्याने सगळ्यांना खावीशी वाटते. भेळ खाण्यात कोणाला मजा येत नाही? नावाप्रमाणेच ’भेळ’ करायलाही सुटसुटीत, पण पहिला घास तोंडात घेतला की तोंड असं खवळतं की बस्स ! वाटतं जणू खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे वापरून हा पदार्थ केलाय. आपल्या सर्वांना माहित आहे की भेळ बनवायला खूप सोपी आहे, कारण त्यासाठी जास्त तयारी करावी लागत नाही. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो भेळ बनवण्याच्या अनोख्या स्टाईलमुळेच…होय. ही भेळ सध्या सोशल मीडियावर ‘हेलिकॉप्टर भेळ’ नावाने चर्चेत आली आहे.

‘हेलिकॉप्टर भेळ’ हे नाव ऐकून सुरूवातीला तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे? तुम्ही भेळचे अनेक प्रकार खाल्ले असतील. काही मसालेदार असतात, काही आंबट असतात. पण ही कसली भेळ आहे जी हेलिकॉप्टरसारखी आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तुमची उत्सुकता आणखी न वाढवता जाणून घेऊया. खरं तर ही ‘हेलिकॉप्टर भेळ’ तयार करण्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एका दुकानदाराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एक माणूस भेळ तयार करताना वाटीत भेळ गरगर फिरवून काही सेकंदात सर्व्ह करताना दिसत आहे. त्याच्या या हटके स्टाईलमुळे या भेळीला नाव ‘हेलिकॉप्टर भेळ’ असं मिळालं.

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती भेळचे सर्व साहित्य एका भांड्यात घेतो. यानंतर त्या भांड्यात चमचा गरगर फिरवत तो अशा प्रकारे भेळ बनवतो की पाहणाऱ्यालाही चक्कर येईल. हेलिकॉप्टर सारखी गरगर फिरणारी ही भेळ छान मिसळते. वाडग्यात रोल केल्यानंतर हा दुकानदार हेलिकॉप्टर भेळ लोकांना प्लेटमध्ये सर्व्ह करतो. ही हेलिकॉप्टर भेळ खाण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

आणखी वाचा : आश्चर्य! पृथ्वीवरील या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, इथल्या लोकांना अंधारच माहिती नाही, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कॅफेमध्ये कपलंच नव्हे तर सापही रोमान्स करतात! विश्वास बसत नसेल तर हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर trollgramofficial नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताच हा व्हिडीओ काही वेळात व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत याला ९३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी यावर अनेक मजेशीर कमेंटही केल्या आहेत. आणखी काही काळ असेच फिरवले तर त्यातून वीज निर्माण झाली असती, असे एका व्यक्तीने लिहिले आहे. काही लोकांना त्यातून ठिणगी पडतानाही दिसली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO: व्यक्तीने झाडावर बनवली सर्वात सुंदर 3D पेंटिंग; Viral Video पाहून लोकही झाले थक्क!

संबंधित बातम्या

जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
FIFA WC 2022: दिग्गज मॅराडोनाचा मेस्सीने मोडला विक्रम! ऑस्ट्रेलियावर मात करत अर्जेंटिना पोहचली क्वार्टर फायनलमध्ये
IND vs BAN 1st ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन