सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी शिकारीचे तर कधी जंगलात फिरणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा प्राणी मनुष्यवस्तीत शिरकाव करतानाही दिसतात तर कधी काही लोक जंगली प्राण्यांना हुसकवण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:च जीव संकटात टाकतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. हत्तीला हुसवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एका IFS अधिकाऱ्याने शेअर केला आहे जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. हत्तीला विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळाले आहे असे नेटकरी म्हणत आहेत.

एका IFS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस काठीने हत्तीला हुसकावत आहे. सुरुवातीला हती काहीच प्रतिक्रिया देत नाही. हत्ती शांतपणे जाणार असतो तरीही ती व्यक्ती पुन्हा हातातील काठीने हुसवण्याचा प्रयत्न करते, हत्तीचे सोंडवर काठीने मारते. त्यानंतर हत्ती चवताळतो आणि त्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी धावतो. ते पाहून व्यक्ती तेथून पळ काढते. हत्ती त्याच्या मागे धावताना दिसत आहे. व्यक्तीसह आसपासचे इतर लोकही सैरावैरा धावू लागतात. व्हिडीओ फक्त ४ सेकंदाचा आहे पण व्हिडीओने X वर चर्चा घडवून आणली आहे. वन सेवा विभाग आणि अधिकाऱ्यांद्वारे वारंवार लोकांना वन्य प्राण्यांपासून दूर राहण्यास सांगतिले जाते तरीही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हा व्हिडीओ पाहून लक्षात येते की विनाकारण प्राण्यांना त्रास देऊन लोक त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण आहे का? मग ११ सेंकदात चेरीमध्ये दडलेले टोमॅटो शोधून दाखवा!

IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी एक जुना व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक माणूस काठीने हत्तीला मारत आहे. २०२२ मध्ये कौशिक बरुआ या वापरकर्त्याने हा व्हिडिओ पहिल्यांदा शेअर केला होता. आसाममध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख करत बरुआ यांनी लिहिले, “जेव्हा मनुष्य वन्यजीवांना घाबरत नाही तेव्हा वन्यजीवही मनुष्याला घाबरत नाही तेव्हा ते निसर्गामध्ये एकत्र राहणे नसून ही आपत्ती उद्भवणारी कृती असते,” . मेहराने व्हिडिओ पुन्हा शेअर केला, “फक्त वेडेपणा. एखाद्या असे विचार का सुचक असतील? अशा चिथावणीमुळे मनुष्य-प्राण्यांमध्ये नक्कीच संघर्ष होतो.”

हेही वाचा – आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”

हा व्हिडिओ एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आल्यापासून, त्याला जवळपास१६००० पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. X वर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. प्राण्यांबरोबर मनुष्याचे वागणे चुकीचे याला सहमती दर्शवत एकाने लिहिले, “खरे आहे, ते टाळले पाहिजे.” दुसरा म्हणाला,”कठोर कारवाई आवश्यक,” आणखी एकाने लिहिले, “रोखरच धक्कादायक वागणूक.”

\

Story img Loader