Viral Video : उन्हाचा फटका फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही बसत आहे. यात पाण्याचे कमी स्रोत उपलब्ध असल्याने अनेक पक्षी, प्राण्यांना तहान भागवणे कठीण होत आहे. त्यातूनच पाण्याविना अनेक प्राण्यांचा तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक कोणत्या ना कोणत्या युक्तीचा वापर करतात, पण प्राणी आणि पक्षी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून असतात, जे स्रोतही आता माणसाने ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांचे खूप हाल होताना दिसत आहेत. अशात सोशल मीडियावर आता कडक उन्हात पाण्याविना तडफडणाऱ्या एका चिमणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती माणुसकीचे दर्शन घडवत चिमणीला पाणी देत जीवनदान देत आहे.

वाटसरूने वाचवले चिमणीचे प्राण

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुपारच्या वेळी भर उन्हात एका रिकाम्या मैदानात पाण्याविना एक चिमणी तडफडत होती. हे दृश्य रस्त्याने जाणाऱ्या एका वाटसरूच्या निदर्शनास येते. या वेळी ती व्यक्ती तहानेने व्याकूळ झालेल्या चिमणीला पाणी देते. या चिमणीला एवढी तहान लागली होती ती तिला उठणेही कठीण झाले होते. ती उन्हाने तापलेल्या मैदानात मेल्यासारखी पडून होती. यामुळे वाटसरूने विलंब न करता चिमणीला बाटलीने पाणी देण्यास सुरुवात केली. पाण्याचा थेंब तोंडात जाताच चिमणी उठून बसली. यानंतर पुन्हा त्याने चिमणीला बाटलीतून पाणी देण्यास सुरुवात केली. पाण्याचा घोट पोटात जाताच चिमणीच्या जिवात जीव आला. यामुळे अगदी पाहिल्यासारखी उत्साहत ती पंख झाडत व्यक्तीच्या हातावर बसलेली दिसली.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

लहान मुलं पाण्यात बुडू नयेत यासाठी तरुणाने बनवला अनोखा टी-शर्ट; आनंद महिंद्रांनी Video पोस्ट करत केलं कौतुक, म्हणाले…

हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जीवाला जीवनदान देणे अमूल्य आहे. चिमणीला जीवनदान देणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल केला जात आहे. यातील वाटसरूच्या दयाळूपणाचे लोक कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, प्रत्येक जीवन मौल्यवान आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की, किती सुंदर दृश्य आहे. त्या व्यक्तीने वेळीच त्या चिमणीला मदत केली नसती तर कदाचित तिच्या जिवाला धोका निर्माण झाला असता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे कडक उन्हात आपल्या सभोवतालच्या प्राणी आणि पक्ष्यांना मदत करा. शक्य असल्यास त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करा. यामुळे या मुक्या प्राण्यांना खूप मदत होईल. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.