ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू उंच उडीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आता उंच उडी मारणाऱ्या या कांगारू चक्क भारतात सुद्धा दिसू लागलाय. नुकतंच पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्यातल अचानक रस्त्यावर कांगारू फिरताना दिसून आले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागाला आहे. या व्हिडीओमध्ये कांगारूला धड चालताही येत नव्हतं, हे पाहून आता सोशल मीडियावर हे कांगारू भारतात कसे काय आले? यावर चर्चेला उधाण आलंय.

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात काही लोकांनी कांगारू रस्त्यावर फिरताना पाहिले. याचा धक्कादायक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. कांगारू हा प्राणी सहसा ऑस्ट्रेलिया, टास्मानिया आणि न्यू गिनी वगळता जगात कुठेही आढळत नाहीत, त्यामुळे भारतातील रस्त्यावर त्यांना पाहून अनेक लोक हैराण झाले. हे प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासापासून हजारो मैल दूर कसे काय स्थलांतरित झाले याबद्दल अनेकांना चिंता होती. ANI या वृत्तसंस्थेने पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीच्या रस्त्यांवर फिरत असलेल्या कांगारूंची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओंमुळे लोकांना आश्चर्य वाटले की ते भारतात कसे आले आहेत. अनेकांनी असा अंदाज लावला की हे कांगारू प्राणीसंग्रहालयातून निसटले असावेत, तर काहींनी दावा केला की त्यांची तस्करी झाली असावी.

आणखी वाचा : रुग्णवाहिकेच्या मागे तब्बल ५ मैल धावत राहिला घोडा, का ते जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

IFS अधिकाऱ्याने ट्विट करून ही माहिती दिली
दरम्यान, IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर प्राण्यांची तस्करी होत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ते (कांगारू) या भागातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात नाहीत. ते तस्करीचा भाग आहेत. मात्र, नंतर ते जप्त करण्यात आले. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्यातही एका कांगारूसह दोन जणांना अटक करण्यात आली होती.

आणखी वाचा : ऐकावं ते नवलंच! आजोबांनी बांधलं कुत्र्याचं अनोखं मंदिर, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Ganesh Temple Street : अमेरिकेतही बनली ‘गणेश मंदिर गल्ली’, पाहा हा VIRAL VIDEO

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जलपाईगुडी आणि सिलीगुडी येथील तीन कांगारूंची सुटका केली. अधिकाऱ्यांना सिलीगुडीजवळ एका कांगारूच्या पिल्लाचा मृतदेहही सापडला. बैकुंठपूर वनविभागांतर्गत बेलाकोबा वन परिक्षेत्राचे रेंजर संजय दत्ता म्हणाले, “कांगारूंच्या शरीरावर काही गंभीर जखमा होत्या आणि त्यांना पुढील उपचारांसाठी बंगाल सफारी पार्कमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक नेमण्यात आले आहे.

रेंजर संजय दत्ता म्हणाले, “या कांगारूंचा ठावठिकाणा, त्यांना कोणी आणि कसे जंगलात आणले, तसेच त्यांना आणण्यामागील कारण शोधण्यासाठी आम्ही पुढील तपास सुरू केला आहे. याचीही खातरजमा केली जाईल.” अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘बचाव केल्यानंतर तिन्ही कांगारूंना उपचारासाठी पाठवण्यात आले. या कांगारूंना इथे कोणी आणि कसे आणले असा प्रश्न पडतो. या कांगारूंची नेपाळमध्ये तस्करी होत असल्याचा आम्हाला संशय आहे. पण आम्ही तस्करीमागील हेतूही तपासत आहोत.”