Guinness Book Of World Record : गिनीज बुकात विविध आणि भन्नाट गोष्टींच्या विक्रमांची नोंद केली जाते. मग यामध्ये जगातील सर्वात मोठे सँडविच बनवण्याचा, एक लिटर टोमॅटो सॉस पिणे असा विक्रम असुदे किंवा सलग साडे तेरा तास गाणी गाण्याचा विक्रम असुदे; सर्व प्रकारच्या ‘टॅलेन्ट’ची यामध्ये नोंद केली जाते. अशातच, सध्या अजून एका विक्रमाची सोशल मिडियावर चर्चा होत आहे. ती म्हणजे एका व्यक्तीने आपल्या नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये मिळून एकूण ६८ काड्यापेटीच्या काड्या घालून गिनीज बुकात आपले नाव नोंदवले आहे.

विक्रम बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव, पीटर फॉन टँगेन बुस्कोव्ह [Peter von Tangen Buskov] असे आहे. ३९ वर्षाच्या या व्यक्तीने ‘नाकपुड्यांमध्ये सर्वाधिक काड्या बसवण्याचा विक्रम केला आहे’, असे म्हणत गिनीज बुकने त्याला किताब दिला आहे. “खरंतर हा विक्रम करताना मला अजिबात दुखापत किंवा त्रास झाला नाही. मुळातच माझ्या नाकपुड्या मोठ्या आहेत आणि त्वचा इतरांच्या तुलनेत अधिक लवचिक आहे. या दोन गोष्टींची मला नक्कीच मदत झाली असावी” असे गिनीज बुकला दिलेल्या मुलाखतीमध्ये बुस्कोव्हने सांगिलते.

chennai mother commits suicide on social trolling (फोटो - सोशल व्हायरल)
ऑनलाईन ट्रोलिंगची बळी ठरली महिला? चिमुकल्याच्या बचावाचा Video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय!
gold chain snatcher lonavala marathi news
लोणावळ्यात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न
Man finds chicken in paneer biryani
पनीर बिर्याणीत आढळला चिकनचा तुकडा, धार्मिक भावना दुखावल्याची व्यक्तीची तक्रार, झोमॅटो म्हणे, “कोणाच्याही भावना….”
Woman fulfills Bollywood dream by dancing to Sridevi song
श्रीदेवीप्रमाणे साडी नेसून बॉलीवूड गाण्यावर महिलेने केला डान्स, लेकाने पूर्ण केले आईचे स्वप्न! पाहा Viral Video
xenotransplantation
डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; विज्ञानाचा चमत्कार मानले जाणारे झेनोट्रांसप्लांटेशन आहे तरी काय?
Funny dance video of groom danced vigorously in front of his bride
हौशी नवरा! नवरदेवानं बायकोसाठी लग्नात केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
US Couple Accidentally Ship Their Cat In Amazon Return Box, It Arrives 6 Days Later
हद्दच झाली राव! पार्सल परत करण्याच्या नादात चुकून मांजरीलाच बॉक्समध्ये केले पॅक, ६ दिवस अन्न-पाण्याशिवाय….
Viral video captain proposes flight attendant
तू माझ्याशी लग्न करशील? पायलटने भर विमानात गुडघ्यावर बसून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

हेही वाचा : या पठ्ठ्याने चक्क ‘एक लिटर’ टोमॅटो सॉस पिऊन बनवला ‘गिनीज रेकॉर्ड’! व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा

परंतु हा विक्रम करण्यामागे काही विशेष कारण होत का?

‘आपण काहीतरी वेगळं आणि मजेशीर गोष्टी करून विक्रम बनवू शकतो’ असा विचार करून बुस्कोव्हने हा विक्रम बनवण्याचा विचार केला. “ही कल्पना अगदी सहज मनात आली” असे बुस्कोव्ह म्हणतो. गमंत म्हणजे अगदी लहान वयातदेखील त्याला कधीही नाकात कोणती वस्तू घालायची इच्छा झाली नव्हती. बुस्कोव्हच्या नाकामध्ये ६८ काड्याच बसू शकत होत्या; मात्र त्याचा विश्वास आहे कि तो याहून अधिक काड्या नाकपुड्यांमध्ये बसवू शकतो “या काड्यांची संख्या वाढवण्यासाठी मला थोड्या ट्रेनिंगची गरज लागू शकते. किंवा कदाचित जसजसे माझे वय वाढेल तसतसे माझ्या नाकपुड्या अजून मोठ्या होऊ शकतील.” असे त्याने गिनीज बुकला माहिती देताना सांगितले.

“मला कधीच वाटलं नव्हतं कि माझ्या नावावरदेखील असा एखादा विक्रम असेल. मी कायमच आयुष्यात काहीतरी भन्नाट करण्यामागे लक्ष देत असायचो. आपण जर मोकळ्या मानाने, खुल्या विचाराने जगाकडे पहिले तर अनुभवण्यासाठी असंख्य गोष्टी आहेत. आपण आयुष्यात कधीकधी वेगळ्या गोष्टी करून पाहाव्या किंवा इतरांना असे विक्रम बनवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, माझ्या या विक्रमाकडे पाहून लोकांना प्रोत्साहन मिळलेल अशी मी अशा करतो.” असे बुस्कोव्ह म्हणतो.

हेही वाचा : Viral video : ही जगावेगळी ‘शिट्टी’ ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! गिनीज बुकात नोंद झालेल्या ‘लुलु लोटस’चा ‘हा’ व्हिडीओ पाहा

हा विक्रम रचल्यानंतर बुस्कोव्ह अजून एक विक्रम रचण्याचा विचार करत आहे. मात्र यावेळेस तो नीट तयारी आणि प्रॅक्टिस करणार असल्याचे म्हणतो “मी आणि माझ्या मुलाने काही रेकॉर्ड्स करून पाहण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यशस्वी होण्यासाठी आम्हाला अजून मेहेनत घ्यावी लागणार आहे.” असे बुस्कोव्ह सांगतो.

यावर विचित्र विक्रमावर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यामध्ये एकाने, “बापरे हे खूपच भन्नाट आहे. लोकांकडे खरंच वेगवेगळी कला असते” असे म्हंटले आहे. तर अजून एकाने, “हे केल्यानंतर तुम्ही खूपच मजेशीर, विनोदी दिसत आहेत.. परंतु, असं करताना थोडातरी त्रास झालाच असेल” अशी काळजी व्यक्त केली.

बुस्कोव्हच्या या विक्रमाबद्दलची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केली आहे. तसेच एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरूनदेखील या विक्रमचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आत्तापर्यंत २९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.