आजकाल सोशल मीडियावर छोटे-मोठे व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल होतात आणि त्यातून अनेकदा समाजातील वेगवेगळे प्रश्न समोर येतात. रस्ते, वाहतूक नियम, पार्किंग आणि नागरिक-प्रशासन यांच्यात होणारे वाद नवीन नाहीत; पण कधी कधी काही प्रसंग इतक्या वेगळ्या पद्धतीने घडतात की, ते लोकांचे लक्ष वेधून घेतात.
काही वेळा एका क्षणाच्या निर्णयामुळे साधी गोष्ट मोठ्या चर्चेचा विषय बनते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे, ज्यामुळे सुरक्षितता, नियम व जबाबदारी याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपली स्कूटर टोईंग क्रेनकडून उचलली जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न दिसत आहे.
क्रेननं स्कूटर उचलण्याची प्रक्रिया सुरू केली असताना त्या व्यक्तीने अचानक स्कूटरवर जाऊन बसण्याचे ठरवले. त्याला वाटले, की तो स्कूटरवर बसला, तर कर्मचारी वाहन उचलणे थांबवतील; पण तसे झाले नाही. क्रेनने स्कूटरसह त्या व्यक्तीलाही हवेत उचलले आणि काही फूट उंचीवर तो स्कूटरला घट्ट धरून बसलेला दिसतो.
पाहा व्हिडीओ
हा संपूर्ण प्रकार जवळ उभ्या असलेल्या लोकांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि काही वेळातच तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साध्या पार्किंगच्या वादातून ही घटना अचानक धोकादायक स्वरूपात बदलली. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जण त्या व्यक्तीच्या हट्टाला आणि आपल्या वाहनाबद्दलच्या प्रेमाला आश्चर्यकारक म्हणत आहेत; तर अनेकांनी हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले आहे.
काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की, वाहनावर व्यक्ती बसलेली असताना ते उचलणे योग्य आहे का, तर काहींनी त्या व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घातल्याचे म्हटले. अनेकांनी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही शांतपणे आणि सुरक्षिततेचा विचार करून वागणे गरजेचे आहे, असे म्हटले. एका छोट्या पार्किंग वादाने मोठे रूप घेतले आणि या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की, क्षणिक राग किंवा हट्टामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

