विमानाच्या चाकांजवळ बसून तरुणाचा अडीच तास प्रवास, ३३ हजार फुटांवर होतं विमान; पहा धक्कादायक व्हिडीओ

विमानाच्या लँण्डिंग गेअरजवळ बसून या तरुणाने इतक्या उंचीवर आणि लांब प्रवास नेमका केला कसा हा प्रश्न सर्वांना सतावत आहे

Airplane, Landing, Viral Video, American Airlines
विमानाच्या लँण्डिंग गेअरजवळ बसून या तरुणाने इतक्या उंचीवर आणि लांब प्रवास नेमका केला कसा हा प्रश्न सर्वांना सतावत आहे

अमेरिकेतील एका व्यक्तीने विमानाच्या लँडिग गेअरवर बसून प्रवास केल्याची अजब घटना समोर आली आहे. हे विमान जवळपास अडीच तास हवेत होतं. यावेळी हा व्यक्ती विमानाच्या लँडिंग गेअरजवळच बसून होता. विमानाचं लँण्डिंग झाल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी जेव्हा एक व्यक्ती लँडिंग गेअरवर बसल्याचं पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं असता प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. जाणून घ्या नेमकं काय घडलं…

डेली मेलच्या वृत्तानुसार, अमेरिकन एअरलाइन्सच्या (American Airlines) विमानाने ग्वाटेमाला (Guatemalan) येथून मियामीसाठी (Miami) उड्डाण केलं होतं. मात्र यावेळी विमानातील प्रवाशांशिवाय अजून एक व्यक्ती या विमानातून प्रवास करत होती. मात्र ही व्यक्ती विमानाच्या आत नाही तर बाहेर होती.

विमानाला मियामीला पोहोचण्यासाठी अडीच तास लागले. तोपर्यंत ही व्यक्ती ३३ हजार फूट उंचीवर लँण्डिंग गेअरजवळच बसली होती. विशेष म्हणजे त्याला काहीही हानी झाली नाही. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मियामी विमानतळावर २६ वर्षीय तरुणाला पकडण्यात आलं आहे, जो ग्वाटेमाला येथून येणाऱ्या एका विमानाच्या लँण्डिंग गेअर बॉक्समध्ये उपस्थित होता”.

शनिवारी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आली आहे. विमानाने लँण्डिंग केलं तेव्हा हा तरुण खूप घाबरला होता. त्यांना रुग्णावहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं.

दरम्यान विमानाच्या लँण्डिंग गेअरजवळ बसून या तरुणाने इतक्या उंचीवर आणि लांब प्रवास नेमका केला कसा हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. याआधी अशा प्रकरणांमध्ये अनेकांचा आकाशातून किंवा लँण्डिंग-टेक ऑफ दरम्यान खाली पडून मृत्यू झाला आहे. काही प्रकरणांमध्ये गोठवणारी थंडी आणि ऑक्सिजन कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण हे प्रकरण आश्चर्यकारक असून अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man sitting on plane wheels hanging in air for two hours landing gear flight sgy

ताज्या बातम्या