Shocking video: जगात अनेक विचित्र प्रकारचे लोक पाहायला मिळतात. हे कधी काय करतील याचा नेम नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्याचं झालं असं की, एका व्यक्तीला अचानक पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्या व्यक्तीने दुकानातून औषध घेऊन त्याचे सेवन केले. तरुणानं पोटदुखीचं औषध म्हणून चक्क किडे मारण्याचं औषध प्यायलं. मात्र पुढे जे घडलं ते पाहून डॉक्टर्स सुद्धा हादरले. डॉक्टरांना देखील आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. चला तर मग पाहूया डॉक्टरांना त्या व्हिडीओमध्ये असं दिसलं तरी काय? जे पाहून त्यांना धक्का बसला.

समोर आलेलं हे प्रकरण खूपच विचित्र आणि धक्कादायक आहे. एका व्यक्तीचं पोट दुखत होतं. त्यानंतर तो एका मेडिकलमध्ये गेला आणि पोटदुखीची गोळी आणली. जेवणाच्या काही तासानंतर त्याला उलटी झाली. त्याच्या पोटातून जिवंत गांडूळ बाहेर पडलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बेसिनमध्ये हा किडा वळवळताना दिसतोय.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, उलटीसह माणसाच्या पोटातून एवढा मोठा किडा बाहेर आला आहे, जे पाहून तो स्वतःच हैराण झाला नाही तर पाहणाऱ्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसेना. त्या व्यक्तीला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता, त्यानंतर त्याने मेडीकल दुकानात जाऊन औषध घेतले. रात्री औषध घेऊन तो झोपला. मात्र सकाळ होताच त्याला उलट्या होऊ लागल्या. त्याला उलटी झाली तेव्हा त्याच्या तोंडातून जिवंत जंत बाहेर आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Taiwan Earthquake Video: अन् मृत्यूही हरला! तैवान भूकंपात नर्सनी जीव धोक्यात घालून बाळांना वाचवले; थरारक ३१ सेंकद व्हायरल

हा व्हायरल व्हिडिओ @StarBede नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ही पोस्ट आतापर्यंत २७ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने या पोस्टवर “माझ्यासोबत असे झाले तर?” दुसऱ्या युजरने लिहिले की, “खूप धक्कादायक व्हिडिओ.” त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, “हे पाहणे किती भयानक आहे.”