Shocking Video Viral : उन्हाळा प्रचंड आहे, उकाड्याने हैराण होत असल्याने गावाकडे लोक नदी, ओढ्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. अनेकजण अशा थंड ठिकाणी फिरायला जात आहेत. पण अशा नदी किंवा समुद्राच्या ठिकाणी फिरताना काळजी घेणं फार गरजेचे असते. अन्यथा एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक काका नदीत पोहण्याचा आनंद घेतायत, पण पोहताना अचानक त्यांच्याजवळून मगर जाते. जिला ते काहीतरी वस्तू समजून चक्क उचलतात आणि पुढे जे काही घडतं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल. पण या घटनेनंतर काका चुकूनही नदीत पोहायला जाणार नाही हे मात्र तितकचं खरं आहे.

व्हिडीओत पाहू शकता की, एक काका नदीत पाण्यातून चालत असल्याचे दिसतायत, पण ते चालत असतानाच अचानक त्यांच्या पायाजवळ काहीतरी वळवळत असल्याचे जाणवते. सुरुवातीला ते पायाजवळ काय आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी न राहून ते पाण्यात हात घालून तपासू लागतात. तपासत असतानाच त्यांच्या हाताला काहीतरी लागते ते सरळ उचलून वर आणतात. जेव्हा ते त्याला उचलून पाण्याबाहेर काढतात, तेव्हा ते मगरीचं पिल्लू असते, ज्याला पाहून त्यांना मोठा धक्का बसतो.

मगरीच्या पिल्ल्याच्या मानेला पकडून ते वर आणतात. पण जेव्हा ते पिल्लू प्रत्यक्ष पाहतात तेव्हा ते घाबरून फेकून देतात आणि पळत बोटीत जाऊन बसतात.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट नाही, पण नदीत पोहताना किती काळजी घ्यावी लागते हे स्पष्ट होतेय.

मगरीचा हा व्हिडीओ @RealPushprajX नावाच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की. “आज काका देवाला भेटले असते.” दरम्यान अनेक युजर्सही त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युझरने लिहिले की, “भावा, देवाने त्यांना वाचवले आहे; देवाच्या कृपेने त्यांचे रक्षण झाले आहे.” आणखी एका युझरने लिहिले की, हा एक एआय (AI) व्हिडिओ असल्याचे दिसते.