Viral Video : आई मुलाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. आईचे प्रेम आणि माया हे वयानुसार वाढत जाते. आई आणि मुलांच्या नात्यातील प्रेम दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या ६७ वर्षांच्या आईबरोबर ३८० किमी बाइक राइड करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. (Man takes 67 years old mother on Long Bike Ride)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आई मुलाची जोडी ही पहाटे राइडसाठी तयार झालेली दिसत आहे. त्यांनी सुरक्षिततेसाठी रायडिंग जॅकेट, फूल बॉडी प्रोटेक्टिव्ह गिअर घातले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलगा लांजासाठी प्रवास सुरू करण्यापूर्वी दुचाकी(harley davidson x440) ची पूजा करतो आणि पहाटे ५.३० वाजता मुंबईतून प्रवास सुरू करतो. हा व्हिडीओ १४ जून चा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुलगा आणि आई या राइडचा आनंद घेताना दिसत आहे. राइडदरम्यान ते काही ठिकाणी विश्रांती घेतात, कधी नाश्ता करतात तर कधी खरेदी करतात.

If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Pune Girl Dangerous Bike Ride Video
पुण्याच्या १.६ मिलियन फॉलोअर्स असलेल्या तरुणीचा वादग्रस्त Video पाहून भडकली जनता; मोहोळ, फडणवीसांसह फोटो चर्चेत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे

या प्रवासात त्यांना मुसळधार पावसात सुद्धा प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे ते लांजावरून सुखरूप सायंकाळी ४.१५ वाजता घरी पोहचतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या आईबरोबर अशी रोमांचक राइड करावीशी वाटू शकते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : एसीतून येणाऱ्या पाण्याचा केला ‘असा’ पुनर्वापर; पट्ठ्याचा जुगाड पाहून नेटकरी म्हणाले, ‘हा तर एलॉन मस्क…’

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘इस प्यार को क्या नाम दूं?’, कुत्रा आणि माकडाचं गच्चीवरचं प्रेम; VIDEO पाहून नेटकरी अवाक्; म्हणाले, “जोडी लाखात एक…”

sandy_veer या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ मुलाने शेअर केला असून या मुलाचे नाव संदीप वीर आहे. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईबरोबर पहिली लॉन्ग बाइक राइड मुंबई ते कोकण; लांजापर्यंत ३८० किमी राइड, आई रॉक्स”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सोशल मीडियावर पाहिलेला आज पर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “दादा आयुष्यातली खुप मोठी गोष्ट तुम्ही अनुभवली….खुप खुप प्रेम आईंना नमस्कार” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुम्ही इतका दूरचा प्रवास केला.. सगळा विचार करुनच केला असणार .. तुमचं कौतुक आहे. आईंना नमस्कार. काळजी घ्या दादा”

एक युजर लिहितो, “आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करणे यापेक्षा मोठे सुख काय. मी पण तुमच्या एवढा नाही पण लहान रायडर आहे, माझी आई नाही पण असती तर तिलाही असेच कधी कधी फिरवले असते बाईक वरून. भावूक झालो व्हिडिओ बघून, खूप छान दादा, बाईक वरून फिरण्याची आईची इच्छा अशीच पूर्ण करा आणि आईला माझा नमस्कार.” तर एक युजर लिहितो, “दोघांनाही मानाचा मुजरा… अप्रतिम…..” अनेक युजर्सनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.