आजची तरुण पिढी काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचा खजिना आहे. रोज इथे हजारो व्हिडीओ पाहिला मिळतात आणि ते व्हायरल होतात. या माध्यमांवरील काही व्हिडीओ आपल्याला भावनिक करुन जातात. सध्या ट्विटरवर अशाच एका व्हिडीओची चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आत्महत्या करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये एक व्यक्ती काही वेळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभा असलेला दिसत आहे. त्यानंतर गाडी येण्याचा अंदाज दिसला की रूळावर उतरतो आणि गाडी ज्या ट्रॅकवरून येत आहे त्या ट्रॅकवर मान ठेवतो. त्यानंतर काही क्षणात या प्रकाराकडे तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे लक्ष जाते. येवढ्यात महिला पोलीस कर्मचारी धावत येते आणि त्याला बाजूला सारते. त्यानंतर वेगाने आलेली ट्रेन निघून जाते. या महिला कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचला नाहीतर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला असता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: फोटो काढायला हत्तीच्या जवळ गेला, चवातळलेल्या हत्तीने तरुणाला भयंकर इंगा दाखवला
हा व्हिडिओ RPF_INDIA या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. के. समंथी असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे