Watchman Viral Video Reveals Student Struggle: शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळेल, कुटुंबाला हातभार लागेल, आपला संसार मार्गी लागेल, अशी स्वप्न भारतातल्या प्रत्येक तरुणाचं असतं. लहानपणापासून आई-वडिलांनी खस्ता खाऊन शिक्षण दिलेलं असतं. त्यामुळं कॉलेजात उच्चशिक्षण घेताना मध्यम वर्गातील तरुणांच्या मनात धाकधूक असते. आपलं नशीब कुठं घेऊन जाईल, याची प्रत्येकाला काळजी असते. काही जणांना संधी मिळते, तर अनेकांना वाट पाहावी लागते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका संधीची वाट पाहत खडतर मार्ग निवडणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जिथे शिकला, तिथेच वॉचमन झाला

इन्स्टाग्राम युजर साहिलने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने एका महाविद्यालयात सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या युवकाची मुलाखत घेतली. या व्हिडीओच्या सुरुवातीला ‘पुरूष आणि त्यांच्या आतलं सुप्त युद्ध’, हे कॅप्शन वाचायला मिळतं. यावरूनच आपल्याला कळतं की, आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण कोणत्या मानसिकतेतून जात आहेत.

ज्या महाविद्यालयात मी शिक्षण घेण्यासाठी आलो, आज तिथंच मी सुरक्षा रक्षकाची नोकरी करतोय, असं वाक्य व्हिडीओतील तरुण उच्चारतो. “मी आताही महाविद्यालयात येतो, पण माझी जागा आता सुरक्षा रक्षकाच्या ठिकाणी आहे. विद्यार्थी मला येऊन भेटतात, तेव्हा जुन्या दिवसांची आठवण होते. पण खरं सांगू का, मनातून मी अक्षरशः तुटलेलो असतो. माझं नशीब मला कुठून कुठे घेऊन आलं, हाच विचार करतो”, अशी खिन्न भावना हा तरूण व्यक्त करताना दिसतो.

हा तरुण सांगतो, “एकेकाळी या महाविद्यालयात मी बीटेकसाठी प्रवेश घ्यायला आलो होतो. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला माझे शिक्षण पुढे चालू ठेवता आले नाही. मग मी थ्रीडी ॲनिमेशनसाठी प्रयत्न केले. थ्रीडी ॲनिमेशन आणि गेम डिझायनरमध्ये बीएससी करण्याचा प्रयत्न केला, पण तेही करणे शक्य झाले नाही.”

https://www.instagram.com/reel/DaswXCbNGGi

या तरुणाने त्याला अवगत असलेल्या कौशल्याबाबतही भाष्य केले. तो म्हणाला, “मला थ्रीडी स्टुडिओ मॅक्स, सिनेमा ४डी आणि झेडब्रश सारखे व्यावसायिक सॉफ्टवेअर उत्तम येतात. या महाविद्यालयातील तरुण मला अधून मधून पुन्हा शिक्षण घेण्याची प्रेरणा देत असतात. पण कधी कधी नशीबाचीही साथ गरजेची असते.”

chanakya niti according 5 things you should never tell anyone
आयुष्यात जे हवंय ते सगळं मिळेल फक्त तुमच्या ‘या’ ५ गोष्टी कुणालाच सांगू नका; आचार्य चाणक्यांनी सांगितले यशाचे गुपित

लोकांनी व्यक्त केली सहानुभूती

साहिलने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याला नाउमेद न होण्याचा सल्ला दिला. ‘एके दिवशी सगळं काही चांगलं होईल’, अशी कमेंट एका युजरने केली. तर काहींनी या तरुणाचा संपर्क मागून त्याला आपण मदत करू शकतो का? असा प्रश्न विचारला.

तर काहींनी करीअर मार्गदर्शन केले आहे. शिक्षण घेतानाच ५ वर्षांचे नियोजन करण्याचा सल्ला एका युजरने दिला. कधीही हार न मानता पुढे मार्गक्रमण करत रहा, असा दिलासाही लोकांनी दिला.