हॉटेलमध्ये अनेका अव्वाच्या सव्वा बील आकारल्यामुळे ग्राहकाची गोची होते. अभिनेता राहुल बोस याला एका हॉटेलमध्ये दोन केळीसाठी ४४२ रूपये आकारल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाचा ऑस्ट्रेलियामधील एक प्रकार समोर आला आहे. एका बिअरसाठी व्यक्तीला तब्बल ७१ लाख रूपये आकारले आहेत.

ऑस्ट्रेलियातील क्रीडा पत्रकार असलेल्या पीटर लालोर याला मॅनचेस्टर येथे एका बीअरच्या बाटलीसाठी ७१ लाख रूपयाचे बील भरावे लागले. पीटरने सोशल मीडयावर याबबात माहिती दिली आहे.

मॅनचेस्टरमधील मालमॅशन हॉटेलमध्ये पीटर त्याच्या काही खास मित्रांसोबत गेला होता. येथे त्याने एक बीअरची बाटली मागवली. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पीटर यांनी बील देण्यासाठी डेबिट कार्ड स्वाईप केले. त्यावेळी त्याच्या खात्यातून ९९, ९८३.६४ डॉलर (७१ लाख ६५ हजार ३१ रूपये)99,983.64 डॉलर कमी झाले. चष्मा नसल्यामुळे पीटरला सुरूवातील काही समजले नाही. मात्र, हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने त्याला खात्यातून ९९, ९८३.६४ डॉलर कट झाल्याचे सांगितले. या प्रकारानंतर पीटरने हॉटेलच्या मॅनेजरकडे धाव घेतली. त्यावर मॅनेजरने बिअरची असेल ते पैसे कमी करून उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले.