VIRAL VIDEO : हा ट्रेंड संपण्याचं नाव काही घेत नाही; ‘Manike Mage Hithe’ चं आता गुजराती वर्जन आउट

श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीचं ‘मानिके मागे हिते’ हे गाण्याची क्रेझ काही कमी होत नाही. वेगवेगळ्या भाषेत या गाण्याच्या वर्जन्सचा अक्षरशः पूर आलाय. यात आता गुजराती वर्जनने सुद्धा नेटकऱ्यांना वेड लावलंय.

manike-mage-hithes-gujarati-version
(Photo: Instagram/ yashri_giri2009)

श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानीचं ‘मानिके मागे हिते’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. हे गाणं श्रीलंकन भाषेतलं असलं तरी भारतात सुद्धा या गाण्याचा लोकांची मोठी पसंती मिळतेय. सोशल मीडियावर अनेक जण या गाण्यावर डान्सचे रिल्स तयार करत आहेत. तर काहीजण आपआपल्या भाषेत या गाण्याचं वर्जन सॉंग भेटीला आणत आहेत. मुळ गाण्यांप्रमाणेच याचे वर्जन सॉंग सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या गाण्याचं गुजराती वर्जन सुद्धा आलंय.

श्रीलंकन ​​गाणं ‘मानिके मागे हिते’ बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, मात्र या गाण्याची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वा यांनी गायलेले सुपरहिट गाणं अजूनही इंटरनेटवर राज्य करत आहे. हे गाणं श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशांत ट्रेंड करत आहे. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी, मराठी, बंगाली आणि पंजाबी वर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यात आता गुजराती वर्जनने सुद्धा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. या नव्या वर्जननेही सर्वांचं मन जिंकलं आहे. यशरी गिरी या तरूणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या वर्जनचा व्हिडीओ शेअर केलाय. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

व्हिडीओत पाहू शकता, यशरी गिरी आणि डॉ.देवांशी दर्जी या दोन तरूणींनी एकत्र येत हे ‘मनिके मागे हिते’चं गुजराती वर्जन गायलंय. अगदी हुबेहूब श्रीलंकन भाषेतल्या मुळ गाण्याच्या सुरांमध्ये गुजराती शब्दांची सांगड घातल तयार केलेलं हे गाणं सोशल मीडियावर सुपरहिट ठरतंय. या गुजराती वर्जनमध्ये या दोन्ही तरूणींनी आपले स्वर घालून त्यांच्या गुजराथी भाषेत तयार केलेल्या सॉंगवर नेटिझन्स आता रिल्स देखील करू लागले आहेत. या गुजराती वर्जनला नील यांनी संगीतबद्ध केलं असून अक्कड बक्कड फिल्म्सने या वर्जनचा व्हि़डीओ शूट केलाय. मनाला भावणाऱ्या संगीतासोबत निसर्गाच्या सानिध्यात शूट केलेलं हे गुजराती वर्जन नेटकऱ्यांना खूपच आवडलाय.

आणखी वाचा: Viral Video: काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण नवरी भलतंच करत होती काम

सोशल मीडियावर या गुजराती वर्जनच्या गाण्याने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. ‘The Voice Tales’ या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या गाण्याला पाच हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून इन्स्टाग्रामवर या गुजराती वर्जनची बरीच चर्चा सुरूये.

आणखी वाचा : पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर वर्दीतल्या वडिलांना सलाम ठोकला; बाप-लेकीचा फोटो VIRAL

सोशल मीडियावर हे गुजराती वर्जन व्हायरल झाल्यानंतर यशरी गिरी आणि डॉ.देवांशी दर्जी या दोन्ही तरूणींच्या मधूर आवाजाचे भरभरून कौतुक करण्यात येतंय. त्यामुळे या दोघी तरूणी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स या गाण्याच्या गुजराती वर्जनवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. अनेकांनी या तरूणींच्या कौशल्याचं कौतूक केलंय. तर काही जणांनी गुजराती भाषेचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manike mage hithes gujarati version is viral watch the video here prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या