जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही. देशात जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक क्षेत्रांत जुगाडू लोकांनी नाव कमवले आहे, पण हा जुगाड कधी कधी महागातदेखील पडतो. अनेक ठिकाणी लोकांना जुगाड करावाच लागतो. आपल्याकडे असे असे जुगाड आहेत की, मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सदेखील यामुळे हैराण होतात. भारतीय लोक देशी जुगाड करून कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्यात जगात आघाडीवर आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लोक रोजच्या वापरातील वस्तूंचादेखील असा काही हटके जुगाड करतात की तो कौतुकास्पद असतो. किचनमध्ये काम करताना काही ना काही समस्या असतात. या समस्यांवर उपाय करायचा म्हटला की पैसेही खर्च करावे लागतात. अशाच उपायावर मात करण्यासाठी भारतीय लोक भन्नाट जुगाड शोधून काढत असतात. स्वयंपाकघरात बरेचदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून जुगाड केला जातो, जेणेकरून वेळ वाचेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातल्या कानाकोपऱ्यात काय काय होत आहे याची माहिती आपल्याला मिळत असते. आता सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची धूम आहे, जो पाहून तुम्हीही विचारच करत बसाल.

प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या बाटल्यांचा पुनर्वापर करून अनेक लोक नवनवीन जुगाड शोधून काढत असतात. आता एका पठ्ठ्याने स्वयंपाक करण्यासाठी चक्क प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीचा वापर केला आहे. याचा अशाप्रकारचा जुगाड पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. चला तर पाहूया या पठ्ठ्याने नेमकं काय केलं…

(हे ही वाचा: बसमधली मोफत सीट कुणाची? दोन बायकांमधील दे दणादण हाणामारी पाहून WWE विसरुन जाल; एकमेकींच्या उपटल्या झिंज्या अन्…)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, या तरुणाला स्वयंपाक करण्यासाठी तांदळाची आवश्यकता आहे. तरुणाने तांदळाने भरगच्च भरलेलं पोतं उचलून गॅसच्या ओट्यावर ठेवलं आहे. आता या गोणीतून तांदूळ काढण्यासाठी तरुणाने नवी शक्कल लढविली आहे. तरुणाने सर्वप्रथम या पोत्याच्या खालच्या भागाला एक छोटसं छिद्र केलं आहे आणि याच छोट्याशा छिद्रामध्ये तरुणाने प्लास्टिकची बाटली बसविली आहे. ती बाटली छिद्रामध्ये पूर्णपणे फिट बसविली आहे. जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाजूने गोणीतील तांदूळ खाली पडणार नाही आणि प्लास्टिकच्या बाटलीला तरुणाने झाकणबंद केलं आहे.

आता भात बनविण्याकरीता तरुणाने एक पातेलं घेतलं आहे आणि गोणीतील तांदूळ काढण्यासाठी तरुणाने प्लास्टिकच्या बाटलीतील झाकण उघडं केलं. झाकण उघडं करताच या पोत्यातून तांदूळ पातेल्यात पडत असल्याचे दिसत आहे. तांदूळ काढल्यानंतर तरुणाने पुन्हा झाकण बंद केलं आहे. तरुणाचा हा जुगाड पाहून सर्व जण चकित झाले आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर maximum_manthan नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या जुगाडू तरुणाचे काम पाहून अनेक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.