करायला गेलो एक आणि झालं भलतंच असा अनुभव एका ५० वर्षीय व्यक्तीला आला आहे. इंडोनेशिया मध्ये सेक्स दरम्यान या व्यक्तीला अत्यंत दुर्मिळ असा ‘लिंग फ्रॅक्चर’ झाल्याचा प्रकार घडला आहे. ‘Eggplant Deformity’ असे या फ्रॅक्चरचे नाव असून ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्सनुसार, पत्नीसोबत सेक्स करताना एका ५० वर्षीय पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला. यामुळे त्याला असाह्य वेदना होऊ लागल्या व फ्रॅक्चरमुळे रक्तस्त्राव सुरू झाला तसेच लघवीही होणे थांबले.

रिपोर्ट्समध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार, पेशंटला त्याच्या जोडीदारासोबत सेक्स करताना पेनीस मध्ये क्रॅम्प जाणवल्या. जेव्हा डॉक्टरांनी पुरुषाच्या लिंगाची तपासणी केली तेव्हा त्यांना पुरुषाच्या लिंगामध्ये रक्ताची गाठ आढळली, जी लिंगाच्या वरच्या टोकापासून त्याच्या अंडकोषापर्यंत गेली होती. व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टच्या आसपासच्या नसा, रक्तवाहिन्या सुद्धा खराब झाल्या होत्या.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Narendra Modi amit shah
केंद्र सरकार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात CAA लागू करणार; सूत्रांची माहिती, पोर्टलही तयार

Eggplant Deformity म्हणजे नेमकं काय?

पेनाईल फ्रॅक्चर म्हणजेच पुरुषांच्या प्रायव्हेट लिंगामध्ये फ्रॅक्चर) ही एक दुर्मिळ गोष्ट आहे, एग्प्लान्ट डिफॉर्मिटी मध्ये लिंगाला सूज येते. लिंग जबरदस्तीने वाकवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते, ज्यामुळे पेनीसचा कॉर्पोरा कॅव्हर्नोसा मोडतो. हेमॅटोमामुळे लिंगाचा रंग काळा होऊन तो मध्यभागी फुगतो, म्हणून त्याला एग्प्लान्ट डिफॉर्मिटी असे नाव दिले आहे.

डेली मेलच्या अहवालानुसार, १९२४ पासून आतापर्यंत जगभरात पेनाईल फ्रॅक्चरची २००० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. म्हणजेच दरवर्षी सुमारे अशा १६ घटना घडतात. बर्‍याच वेळा, पेनाईल फ्रॅक्चर झाल्यानंतर, रुग्णांना लैंगिक संबंध बाळगण्यातही अनेक अडचणी येतात.

दरम्यान सुदैवाने या घटनेतील व्यक्तीला तातडीने रुगालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून आता त्यांची अवस्था स्थिर झाली आहे. तब्ब्ल पाच दिवस या रुग्णावर डॉक्टरांची टीम काम करत होती.