Girija Oak: गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीनंतर गिरिजा ओकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच एका हिंदी वेबसाईटवर गिरिजा ओक हिचा एक पॉडकास्ट व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये गिरिजा ओकने तिच्यासोबत घडलेल्या अनेक प्रसंगांबाबत सांगितले. तसंच इंडस्ट्रीमध्ये काम करताना आलेले अनुभव तिने यावेळी शेअर केले. यामध्येच तिने तिच्या शाळेतला एक किस्सा यावेळी शेअर केला. सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गिरिजाचे साडीतील सुंदर फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. त्यानंतर ती ‘न्यू नॅशनल क्रश’ म्हणून ट्रेंड होऊ लागली. गिरिजाचे काही मॉर्फ केलेले फोटोदेखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. यावर तिने तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या गिरिजाने मुलाखतीत सांगितलेला तिचा शाळेतला एक किस्सा व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत गिरिजाने तिच्या वर्गातील अनुभवाचे वर्णन केले आहे. ती सांगते, “ज्युनियर कॉलेजमध्ये एक भौतिकशास्त्राचे शिक्षक होते. त्यांनी वर्गात गेल्यावर मुलींकडे पाहत विचारले What are Babes? (बेब्स म्हणजे काय?) . सरांनी अचानक असा प्रश्न विचारल्यावर आम्ही काही वेळ स्तब्ध झालो. मग त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याकडे पाहिले आणि त्याला प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगितले, पण तेही गप्प होते. मग त्यांनी एका मुलीकडे पाहिले आणि विचारले What are Babes? आम्ही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच होतो. त्यानंतर शिक्षकांनी म्हटले की, दोन प्रकारचे असतात एक Transverse आणि दुसऱ्या longitudinal. शेवटी तेव्हा आमच्या लक्षात आलं की ते वेव्ह्स बद्दल बोलत आहेत. ते What are waves असे बोलण्याऐवजी What are babes असे चुकून म्हणाले होते.”
सध्या गिरिजा ओक हिने सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
