आज २७ फेब्रुवारी. आजचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा आहे. मात्र तुम्हीच विचार करा आपण आपल्या मातृभाषेचा किती आदर करतो? आज आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी भाषेतील शब्दांचा वापर वाढला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे हळूहळू मराठी भाषेतील अनेक महत्वपूर्ण शब्द लोप पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली मातृभाषा जोपासण्यासाठी मराठी भाषेतील शब्द संग्रह वाढविण्याची गरज आहे. इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेचाही तितकाच आदर प्रत्येकाने केला पाहिजे.

भाषेचा माज नाही आदर असावा

याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहिल्या नंतर मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपल्या लक्षात येतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मराठी भाषेचा अभिमान वाटेल. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय विनोदी शोमधील एक जुना व्हिडीओ आज पु्न्हा व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कलाकार मराठी भाषेचं वैभव सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. एका साध्या मातीच्या भांड्याला मराठीमध्ये किती नावं आहे पाहा, “जर ते मातीचं भांडं वाजवण्यासाठी वापरलं तर त्याला घटम म्हणतात, पाण्यासाठी वापरलं तर माठ, अंत्यसंस्काराला मडकं, नवरात्रीला घट म्हणतात, संक्रातीला सुगड, दहीहंडीला हंडी, दही लावण्यासाठी गाडगं, चहा प्यायला कुल्हड होतो, आणि लग्न विधीत अविघ्न कलष होतो.” मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. “भाषेचा माज नाही आदर असावा तेव्हा ती समृद्ध होते” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘मराठी वाजलेच पाहिजे’ या थीमवर पबमध्ये मराठी गाणी वाजवणारा कृणाल घोरपडे कोण? राज ठाकरेंनीही केलं कौतुक

मराठी माध्यमातली मुले कमी होत आहेत. जिथे हजार होती, प्रत्येक वर्गाच्या चारचार तुकड्या होत्या, तिथे जेमतेम चारशे मुले आहेत. इंग्रजी माध्यमाकडे कल वाढतो आहे. उच्च शिक्षितांपासून ते अल्पशिक्षितांपर्यंत. परंतु दहावीनंतर पुढे काय? हा प्रश्न कुणालाच पडत नाही. मराठीच्या शिकवणीची किंवा तिकडे लक्ष देण्याची गरज, नाही शाळाचालकांना, नाही शिक्षकांना, नाही पालकांना. यात भरडतात ती मुले. मराठीची दुरवस्था शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी त्वरित उपाय हवेत.