Marathi bride entry marathi video: सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसात मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हल्ली लग्न मंडपात वधूची एन्ट्री कशी असेल याकडे वऱ्हाडी मंडळीचं लक्ष लागून असतं. यासाठी काही विशेष व्यवस्थापन केलं जातं. कुटुंबीयांकडून काही दिवस डान्सचा सराव केला जातो आणि लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर सादर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून वधूच्या लग्नातील प्रवेशाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, नातेवाईक आणि वधूने जबरदस्त एन्ट्री मारली आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. अशातच नवरीने तिच्या मैत्रीणींसोबत लग्नात मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” या गाण्यावर नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता.

Trending viral video nanand Bhabhi dance in wedding on Khandeshi song marathi video goes viral
‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ नणंदेचा वहिनीसमोर ठसकेदार डान्स; VIDEO ची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी
Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: सिद्धार्थ चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, प्रियांका चोप्राने वहिनीचं ‘असं’ केलं स्वागत, पहिला व्हिडीओ आला समोर
mahakumbh 2025 mela old man made Wife's face in sand in memory of wife emotional video
“आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” कुंभमेळ्यात बायकोच्या आठवणीत आजोबांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
school students couple dance so gracefully on marathi song
“माझं काळीज लागलंय नाचु न गानं वाजू दया” जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी जोडीने केला भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दरम्यान अशाच एका नवरीने आपल्या नवरदेवाच्या स्वागतासाठी भन्नाट असा डान्स केला आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी वधूची वाट पाहात असतात. दरम्यान अचानक “आली ठुमकत नार लचकत’  गाणं वाजू लागतं. गाण्याबरोबरच वधूचे कुटुंबीय एक एक करत नाचत बाहेर येतात. शेवटी वधूची दमदार एन्ट्री होते. ती येताच तिच्यासोबत दोन नातेवाईक एकत्र नाचू लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ajaygaikwadphotography नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नवरीचा डान्स पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, आमच्या लग्नात आम्ही अशीच एन्ट्री घेऊ, मस्त डान्स केला. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, क्या बात है! खरंच छान एन्ट्री घेतली.

Story img Loader