गणेशोत्सव हा देशातील लोकप्रिय उत्सवांपैकी एक सण आहे. गणपती हा हिंदु धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे. भारतमध्ये उत्साह आणि जल्लोषत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण झाले. पण तुम्हाला माहित आहे का की, भारताशिवाय अनेक देशांमध्येही गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो.
पाकिस्तानमध्ये साजरा केला जातो गणेशोत्सव
भारताशिवाय थायलंड, कंबोडिया, तिबेट, चीन, अफगाणिस्तान, जपान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये गणपती बाप्पाची पुजा केली जाते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, पाकिस्तानमध्येही गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक मराठी कुटुंब पाकिस्तानमध्ये गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे.
मराठी कुटुंबाने गायली बाप्पाची आरती
व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक लोक एकत्रितपणे गणपत्ती बाप्पााच्या आरती करत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतात दिसत आहे. उत्साहात आणि जल्लोषात लाडक्या बाप्पाचा जयघोष करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर theamarparkash नावाच्या पाकिस्तानमधील डिजीटल क्रिएटरने हा पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,
“पाकिस्तानामधील कराची येथे मराठी बांधव गणेश चतुर्थीनिमित्त आरती म्हणत आहेत.”
नेटकरी झाले चकित
व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता. अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले तेव्हा उत्तर देताना काही सांगितले की, होय, कराचीमधील मराठी आणि तमिळ लोक हे लोक बंदर शहरांमध्ये व्यवसायासाठी प्रवास करतात.
दरम्यान एकाने कमेंट कर म्हटले की,”व्वा… भारताबाहेर मराठी भाषा बोलली जात आहे हे पाहून आनंद झाला. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा”
पाकिस्तानमधील कराचीमध्ये गणेशोत्सव साजरे करणाऱ्या भक्ताचे आणखी व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. याबाबत AIR मुंबईने ट्विट करत माहिती दिली की, कमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे.
महाराष्ट्र सत्संग परिवार, मराठी हिंदू सेवा संघ कराची मधील रत्नेश महादेव मंदिरात गणेशाचं आगमन.”